गेल्या काही वर्षांपासून प्री वेडिंगचा फंड आलं आहे. आता तर प्रीवेडिंग करणं म्हणजे एखाद्या शास्त्रासारखं असल्यासारखं लोक मानू लागलेत. प्रत्येक जण हटके काही करी करण्याचा प्रयत्नात असतो. या फोटोशूटच्या वेळी नवरा बायकोमधील रोमँटिक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात येतो. काही जोडप्याचं लव्ह मॅरेज असतं तर काही जोडप्यांचं अँरेज मॅरेज. प्रीवेडिंग करण्यासाठी वेगवेगळ्या भारी कल्पना लढवल्या जातात. अशातच आता प्रीवेडिंगचा एका अनोखा व्हिडीओ समोर आलाय.आपल्या होणाऱ्या जोडीदाराबरोबर चांगले फोटो काढण्यासाठी जोडपे वेगवेगळ्या आयडीया शोधत असतात, इतरांपेक्षा आपले फोटो खास असावेत यासाठी ते प्री-वेडिंग फोटोशूटचे वेगवेगळे प्लॅनही करतात. पण कधी कधी हे फोटोशूट खूप अनोख्या पद्धतीने केलं जातं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या असंच एक अजब-गजब प्री-वेडिंग फोटोशूट करणाऱ्या एका जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर काही लोकांनी डोक्याला हात लावला आहे, तर काहींना आपलं हसू आवरणं कठीण होत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्री-वेडिंग शूटदरम्यान एका जोडप्याचा अपघात झाला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक जोडपे प्री-वेडिंग शूटसाठी नदीत उतरताना दिसत आहे. पहिला मुलगा पाण्यात जातो. यानंतर, गाऊन परिधान करून मुलगी पाण्यात उडी मारते. मुलगी आणि मुलगा दोघेही रोमँटिक फोटोशूटसाठी पाण्यात उतरले. मात्र, पुढे असं काही होईल याची कुणालाही कल्पना नव्हती. मुलीने पाण्यात उडी मारताच ती थेट नदीच्या खोल पाण्यात गेली. तिचा गाऊन पाण्यावर तरंगत राहिला. यानंतर आजूबाजूच्या लोकांनी तिला वाचवण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. एका मुलाने तिला पकडण्याचाही प्रयत्न केला, मात्र गाऊनमुळे कुणाला काहीच करता येत नव्हते. काहीवेळाने मुलगी स्वत:च प्रयत्न करुन वर येते. ही मुलगी थोडक्यात वाचली नाहीतर पाण्यात बुडाली असती.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: जगासाठी गुन्हेगार पण तिच्यासाठी ‘तो’ नवराच, कोर्टात जामीनासाठी ढसाढसा रडली बायको; अखेर न्यायाधीशांनाही आली दया..

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

एका ट्विटर युजरने लिहिले की, या पोझसाठी मुलाने खूप मेहनत घेतली आहे, त्याचे आठवडाभराचे जेवण पचले असेल. दुसर्‍याने लिहिलं, “आजकालच्या लोकांना काय झाले आहे?” आणखी एका ट्विटर युजरने लिहिलं, “आजकाल लोकांना दिखावा करण्याची सवय लागली आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: She tried to do something different for her wedding but almost lost her life pre wedding shoot viral video on social media srk