मध्यप्रदेशातील सागर या भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक महिला आपल्या जिवंत असलेल्या पतीला मृत सांगून गेली १० वर्षे पेन्शनचा लाभ घेत होती. सोबतच या महिलेने बीपीएम कार्ड देखील बनवून ठेवले होते. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा या महिलेच्या पतीनेच केला आहे. पतीला या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच त्याने आपल्या बायको विरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी अनेक कलामांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून महिलेला अटक करून कारागृहात पाठवले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशवगंज वॉर्ड मध्ये राहणाऱ्या आरोपी महिलेचं २००१ साली अशोकगंज येथे राहणाऱ्या मोहम्मद अख्तर राईन खानसोबत लग्न झाले. लग्नानंतर अख्तर सागर येथे राहत होते परंतु कौटुंबिक वादामुळे ते अशोकनगर येथे राहायला गेले. २०१७ साली अख्तर यांनी पत्नी शमीमविरोधात अशोकनगरमध्ये तक्रार केली होती.
गर्लफ्रेंड्ससोबत फिरण्यासाठी चोरी करत होता बाईक; पोलिसांनी पकडल्यावर झाले असे काही…
पत्नी शमीम ही बनावट कागदपत्रे बनवून सरकारच्या योजनांचा फायदा घेत असल्याचे अख्तर यांनी तक्रारीत म्हटले होते. तपास करत असताना पोलिसांनी शमीमविरुद्ध फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीनुसार या महिलेने आपले बनावट ओळखपत्र बनवून घेतले होते. ज्यात तिने आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. याच्या मदतीने ती पेन्शन आणि बीपीएल कार्डमधून रेशन घेत होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यावर चर्चा झाली. महिलेचा पती जिवंत असल्याची पडताळणी फोटोवरूनच करण्यात आली. याप्रकरणी ४२० मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या कलमात इतर कागदपत्रांच्या आधारे ४६७, ४६८ बनावट पद्धतीने शासकीय दस्तऐवज तयार करण्यासंदर्भात कलम वाढविण्यात आले आहे. पोलिसांनी त्या महिलेला अटक करून न्यायालयात हजर केले, तेथून तिला तुरुंगात पाठवण्यात आले