प्रेम कधी वया पाहून किंवा समजाने तयार केलेल्या नियमाचा विचार करून केले जात नाही. प्रेमाला कोणीतीही मर्यादा नसते, ना प्रेमाची ना, वयाची. आज काल नातेसंबधमध्ये कॅज्युअल डेटिंगला महत्त्व दिले जाते म्हणजे प्रेम असो नसो पण डेटिंगच्या नावाखाली आज एकाबरोबर तर उद्या दुसऱ्याबरोबर असे नाते जोडले जाते. अशा काळात वयाचे किंवा समाजाच्या नियमांचे बंधन एकमेकांवर मनापासून प्रेम करणारे जोडपे फार कमी असतात. याचीच प्रचिती देणारी निखिल दोशी आणि गीता दोशी यांची प्रेमकथा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. चला काय आहे प्रकरण, जाणून घेऊ या…
गीताने २२ वर्षे अयशस्वी वैवाहिक जीवनाचे दुःख सहन केले. कॅनडामध्ये राहत असताना तिचा नवरा अचानक तिला सोडून गेला तेव्हा ती खूप निराश झाली. ब्रुट इंडियाला दिलेल्या अलिकडच्या मुलाखतीत गीताने सांगितले की, ‘एका दिवाळीत माझा नवरा घर सोडून गेला… मी पोलिसांना फोन केला, अर्ध्या तासानंतर त्याने सांगितले की,”तो सुरक्षित आहे, पण घरी परतण्यास नकार दिला… जेव्हा तो परत आला तेव्हा मी त्याचा हात धरला आणि ठरवले की काहीही झाले तरी मी हा हात सोडणार नाही.” पण ६ महिन्यांनंतर, तिच्या नवऱ्याने तिला पुन्हा एकटे सोडले. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
पहिला नवरा तिला सोडून गेला, निखिल तिचा आधार बनला
त्यानंतर २०१६ मध्ये गीता तिच्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या निखिलला भेटली. निखिल आणि गीता यांच्यातील गप्पा आणि भावनिक आधारामुळे एका खोल मैत्रीचे रूपांतर एका मजबूत नात्यात झाले. २०१६ मध्ये घटस्फोटानंतर, गीता तिच्या माजी पतीच्या लग्नाच्या बातमीने धक्का बसला. या काळात निखिलने तिला भावनिक आधार दिला. तीन वर्षे गीताचे दु:ख समजून घेतल्यानंतर, एके दिवशी निखिलने त्याचे मन मोकळे केले.
ब्रूटशी बोलताना निखिल म्हणाला, “मी तिच्या भूतकाळातील गोष्टी ३ वर्षे ऐकत राहिलो… एके दिवशी मी स्पष्टपणे म्हणालो, ‘गीता, हे सर्व सोड, तू माझ्याशी लग्न करशील की नाही?’
कुटुंबाचा विरोध
दोघांमध्ये वयामध्ये २० वर्षांच्या वयाचे अंतर होते त्यामुळे निखिलच्या कुटुंबाने हे नाते स्वीकारण्यास नकार दिला. त्याच्या आईला खूप धक्का बसला, तर त्याच्या भावाने स्पष्टपणे नकार दिला. त्याने सांगितले की,”ती स्त्री आपल्या आईच्या वयाची आहे.”
घरच्यांचा विरोध असताना केले लग्न
त्याच वेळी, गीतालाही शंका होती की,”एवढ्या मोठ्या वयामुळे ती हे नाते पूर्ण करू शकेल. परंतु निखिल लग्नाच्या त्याच्या निर्णयावर ठाम राहिला. हळूहळू दोन्ही कुटुंबांने त्यांच्या प्रेमापुढे हार मानली. डिसेंबर २०२० मध्ये दोघांचे लग्न झाले. आज, निखिलाची आई, गीताची ओळख ‘माझी लाडकी सून’ म्हणून करते.
गीता म्हणते, ‘मला वाटलं होतं, कारण २ वर्षे, ४ वर्षे किंवा ५ वर्षे… आपल्याला कितीही वेळ मिळाला तरी आपण मोकळेपणाने जगू. पण ही चार वर्षे आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी वर्षे होती.’
निखिल आणि गीता आजच्या काळात खऱ्या प्रेमाला कधी वयाची मर्यादी नसते हे मानणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देतात. ते म्हणतात, ‘मजबूत नात्यासाठी वय हा फक्त एक आकडा असतो.’ निखि म्हणतात की,”प्रेमाला वय नसते…फक्त मने जुळली पाहिजे.”