Viral video: सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात कधी कुठे काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. यामध्ये एक वृद्ध व्यक्ती एसी लोकलमध्ये चढताना उगाच स्टंटबाजी करताना दिसत आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे एसी ट्रेनचे दरवाजे आपोआप बंद होतात, त्यामुळे या ठिकाणी हलगर्जीपणा केला तर तो अंगाशी येऊ शकतो. मात्र या वृद्ध व्यक्तीने कशाचीही पर्वा न करता एसी लोकलचे दरवाजे बंद होताना आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पुढे काय झालं तुम्हीच पाहा.
मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वांत कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात. मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या लोंढ्यांमुळे ही गर्दी वाढत आहे. मुंबई लोकलची गर्दी हीच तिची खरी ओळख झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही. त्यात आता एक नवा व्हिडीओ पाहून तर नव्या प्रवाशाला धडकीच भरेल; मात्र रोजच्या प्रवाशांना हे काही नवीन नाही.
या व्हिडिओमध्ये मुंबई एसी लोकलमध्ये चढताना एक वृद्ध व्यक्ती दरवाजा घट्ट पकडताना, दरवाजे बंद होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की ट्रेन सुरु झाली आहे आणि दरवाजेही हळू हळू बंद होत आहेत. मात्र तरीही जीव धोक्यात घालून हा व्यक्ती बंद झालेले दरवाजे हाताने उघडत ट्रेनमध्ये चढत आहे. सुदैवानं दरवाजाच्या मध्ये हा व्यक्ती अडकत नाही पटकन आतमध्ये जातो. नाहीतर अशाप्रकारे घाई करणं या व्यक्तीच्या जीवावर बेतलं असतं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> दारूच्या नशेत पोलिसांचे लज्जास्पद कृत्य, रस्त्याच्या मधोमध पँटची चेन उघडली अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर हा व्हिडीओ unseen.mumbai नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं लिहलंय “फारच भयंकर” तर आणखी एकानं “काय करायचं असल्या लोकांना आता या आजोबांना काय गरज होती का धावती लोकल पकडायची” अशी प्रतिक्रिया दिली आहे.