भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन आपल्या सहकाऱ्यांमध्ये आणि सोशल मीडियावर गब्बर या नावाने प्रसिद्ध आहे. मैदानात कॅच पकडल्यानंतर त्याची सेलिब्रेशन करण्याची स्टाईल, केशरचना या सर्व गोष्टी अनेक चाहते फॉलो करतात. शिखर धवनची मुलगी आलिया सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.
आलियाने कॅन्सरग्रस्त लोकांसाठी आपले केस कापले आहेत. आलियाने आपला केस कापल्यानंतरचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
आलियासोबत तिच्या बॉयफ्रेंडनेही केस कापले आहेत. यावेळी आलियाने कॅप्शनमध्ये या कामसााठी प्रोत्साहन दिल्यामुळे आई-वडिलांचेही आभार मानले आहेत. यासह इतरांना संदेश देत आलिया म्हणाली, “जर तुम्ही पूर्ण टक्कल करू शकत नसाल तर थोडेसे तरी केस कापा. सर्वांनी आपापल्या पद्धतीने जागरूक रहायला हवी आणि दान करून कॅन्सर पिडितांची मदत करायला हवी.”