Shikshak Din 2023 Shubhecha Marathi: जगभरात शिक्षक दिन हा ५ ऑक्टोबरला साजरा होत असला तरी भारतात मात्र ५ सप्टेंबरला शिक्षक दिनाचे सेलिब्रेशन केले जाते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतात ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आले. डॉ. राधाकृष्णन १९६२ मध्ये भारताचे राष्ट्रपती झाले, तेव्हा काही विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी देण्याची विनंती केली. मात्र, डॉ. राधाकृष्णन यांनी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास सांगितले. अलीकडे कोणताही सण उत्सव म्हटलं की त्याच्या ऑनलाईन शुभेच्छा देणं हा महत्त्वाचा भाग ठरतो. मागील काही काळात म्हणजेच विशेषतः लॉकडाऊन दरम्यान ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व जगाला पटले असल्याने शिक्षक दिनाच्या शुभेच्छा ऑनलाईन सुद्धा द्यायलाच हव्यात.

शिक्षक म्हणजे फक्त शाळा-कॉलेज मध्ये शिकवतात तेच नाही उलट आपल्याला आयुष्यात वेगवेगळ्या टप्यावर मदत करणारा, मार्ग दाखवणारा प्रत्येकजण हा आपला शिक्षकच असतो. अशा सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मराठी शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आपल्यासाठी काही खास Whatsapp Status, Facebook, Instagram Story वर पोस्ट करता येतील असे Free Download HD images घेऊन आलो आहोत, आजच आपल्या फोनवर सेव्ह करून शेअर करा.

school Annual day function viral video
‘शाळेच्या त्या सोनेरी आठवणी…’ मैदानात सराव, मेकअपसाठी एकच फाउंडेशन अन् बरंच काही; VIRAL VIDEO पाहून आठवेल शाळेतला वार्षिकोत्सव
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
Fire at birthday party girl shocking video viral on social media
केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘ही’ चूक करता का? मग हा VIDEO नक्की पाहा
viral video
VIDEO : असे विद्यार्थी मराठी शाळेतच घडू शकतात! संगणकालाही टक्कर देतात हे विद्यार्थी, अनोखी कला एकदा पाहाच
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”

शिक्षक दिन मराठी शुभेच्छा (Happy Teacher’s Day Marathi Wishes)

1) उत्तम शिक्षक तुम्हाला उत्तर देत नाहीत,
ते तुम्हाला स्वतः उत्तर शोधण्यासाठी तयार करतात.

Teachers Day 2023 Wishes in Marathi

2) आई गुरू आहे, बाबाही गुरू आहे.
मित्र, भाऊ, बहीण, शिक्षकही गुरू आहेत.
आयुष्यात ज्यांच्याकडून आपण शिकतो त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत.
माझ्या सर्व गुरूजनांना कोटी कोटी प्रणाम.

Teachers Day 2023 Wishes in Marathi

3) एक पुस्तक, एक पेन, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक संपूर्ण जग बदलू शकतात.

Teachers Day 2023 Wishes in Marathi

4) 2G, 3G, 4G
5G, 6G पण येईल
पण आम्हाला घडविण्यासाठी
गुरुG
शिवाय पर्याय नाही
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.

Teachers Day 2023 Wishes in Marathi

5) आयत्या वेळी ज्ञान देणाऱ्या
गूगल, विकिपीडियाला सुद्धा
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

Teachers Day 2023 Wishes in Marathi

तुम्हीही तुमच्या वेगवेगळ्या कमेंट्स, प्रतिक्रियांमधून आम्हाला वेळोवेळी वेगवेगळे ज्ञान देत असता त्यामुळे तुम्हा सर्व वाचकांना सुद्धा शिक्षक दिनाच्या खूप शुभेच्छा. तुम्हाला वरील शुभेच्छापत्र कशी वाटली हे सुद्धा सांगा.

Story img Loader