अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती तसेच उद्योजक राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर त्यांच्यासंदर्भातील इंटरनेटवरील सर्च आणि चर्चांना उधाण आल्याचं चित्र दिसत आहे. हिरे व्यापारी ते क्रिकेट संघाचे मालक आणि आता थेट पॉर्न प्रकरणातील आरोपी असा राज कुंद्रा यांचा प्रवास सध्या इंटरनेटवर चर्चेत असतानाच त्यांच्याबद्दलची आणखीन एक गोष्ट सध्या व्हायरल होतेय, ती म्हणजे त्यांचं पुस्तक. होय तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण अब्जाधीश असणाऱ्या राज कुंद्रा यांनी एक पुस्तक लिहिलं असून ते संपत्तीसंदर्भातील मार्गदर्शन करणारं पुस्तक आहे. या पुस्तकाची सध्या चर्चा आहे ती या पुस्तकाच्या नावामुळे. राज कुंद्रा यांना पॉर्न प्रकरणामध्ये अटक केल्यानंतर जे पुस्तक चर्चेत आलं आहे त्याचं नाव आहे, हाऊ नॉट टू मेक मनी.

नक्की वाचा >> पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच झाली व्यक्त; Instagram वर पोस्ट करत म्हणाली…

राज यांनी या पुस्तकाची माहिती आपल्या लिंक्डइन प्रोफाइलवर दिली आहे. राज यांनी या पुस्तकाचं लेखन करणं ही अपली उपलब्ध असून त्याचा उल्लेख अकम्पलिशनमेंट्स सेक्शनमध्ये केलाय. हे पुस्तक ऑक्टोबर २०१३ मध्ये प्रकाशित झालं आहे. पेंग्विन प्रकाशनचं हे पुस्तक असून या पुस्तकामध्ये दारुविक्रीची बेकायदेशीर व्यवसाय करुन पैसे कमवणाऱ्या दोन व्यक्तींची कथा आहे. राज यांच्या लिंक्डइन अकाऊंटनुसार सध्या ते जेएलएम स्ट्रीमचे संस्थापक कार्यकारी अध्य आहेत. तर वियान इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ते २०१५ ते २०१७ दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर होते.

नक्की पाहा >> कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी

सध्या राज यांच्या या पुस्तकाची सोशल नेटवर्किंगवर फारच चर्चा आहे. एका युझरने ट्विटरवर पुस्तकाचा फोटो शेअऱ करत, “संस्कारी कुंद्रांनी पुस्तक लिहिलं असून त्याचं नाव हाऊ नॉट टू मेक मनी असं आहे. पण असं वाटतंय की पुस्तकामध्ये ते स्वत:च्याच उद्योगाबद्दल बोलत आहेत,” असा टोला लगावलाय. अन्य एकाने राज कुंद्रा यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव योग्य असल्याचं त्यांनी कृतीतून दाखवून दिलं असा टोला लगावलाय.

१) संस्कारी असा टोला लगावला…

२) खरं करुन दाखवलं

३) हा तर विरोधाभास झाला

२० लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स, कोट्यावधींची कमाई

दरम्यान, राज कुंद्रांच्या चौकशीसंदर्भात बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अश्लील चित्रपट बनवण्याचं काम राज कुंद्रा हे ऑगस्ट २०१९ पासून करत आहेत. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी १०० हून अधिक अश्लील चित्रपटांची निर्मिती केलीय. गुन्हे शाखेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुंद्रांनी या उद्योगामधून कोट्यावधी रुपये कमवल्याचंही सांगितलं जात आहे. ज्या अ‍ॅपच्या माध्यमातून हे अश्लील चित्रपट अपलोड करुन प्रसारित करण्यात येत होते त्या अ‍ॅपला २० लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स होते. यामधूनच कुंद्रा यांना कोट्यावधी रुपये मिळायचे, असं गुन्हे शाखेच्या सुत्रांनी सांगितलं आहे.