व्यवसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपांखाली अटक केली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. फेब्रुवारीमध्ये मढ परिसरातील एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यात अश्लील चित्रपट बनविणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली होती. या गुन्हामध्ये कुंद्रा प्रमुख आरोपी असून त्यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याने अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. राज कुंद्रा यांना सोमवारी रात्री अचानक अटक झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर याचसंदर्भातील चर्चा पहायला मिळाली. अवघ्या काही मिनिटांमध्ये राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी यांचं नाव ट्विटरच्या टॉप ट्रेण्डमध्ये दिसू लागली. मात्र त्याच वेळेस गुगलवरही कुंद्रा यांच्यासंदर्भातील सर्च वाढल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे Movies Made By Raj Kundra हा सर्च करण्यामध्ये महाराष्ट्र हा देशात आघाडीवर असल्याचं चित्र गुगल ट्रेण्ड्समध्ये दिसून आलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा