अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपांखाली व्यवसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना सोमवारी रात्री उशीरा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. फेब्रुवारीमध्ये गुन्हे शाखेने मढ परिसरातील एका बंगल्यावर छापा घालून अश्लील चित्रपट बनविणाऱ्या टोळीला अटक केलेली. हे चित्रपट विविध समाजमाध्यमांद्वारे प्रदर्शित केले जात होते. या गुन्ह्यामध्ये कुंद्रा मुख्य आरोपी असून त्यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केलाय. या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी फेब्रुवारीमध्येच गुन्हा नोंदवला आहे. राज कुंद्रा या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचे दिसत असून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे, असं मुंबई पोलीस आयुक्तांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले. राज कुंद्रा यांना सोमवारी रात्री अचानक अटक झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर याचसंदर्भातील चर्चा पहायला मिळाली. अवघ्या काही मिनिटांमध्ये राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी यांचं नाव ट्विटरच्या टॉप ट्रेण्डमध्ये दिसू लागली. असं असतानाच राज कुंद्रांचं एक जुनं ट्विटही व्हायरल झाल्याचं पहायला मिळालं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा