Shilpa Shetty fitness challenge : अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून योगासनांचे अनेक प्रकार आणि त्या संदर्भातील माहिती युजर्सना सांगते. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिनं युजर्सना एक अनोखं चॅलेंज दिले आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, तिनं ‘मंडे मोटिव्हेशन’मध्ये युजर्सना एक अनोखं चॅलेंज दिलं आहे. हात न सोडता, मनगट फिरवून दाखवण्याचं हे चॅलेंज आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी म्हणते, “आजचे मंडे मोटिव्हेशन’ मी खूप सोपे देणार आहे. मला अनेक कमेंट्स येतात. त्यातल्या काही लोकांचं असं म्हणणं होतं की, असं काही करून दाखवा; जे आम्हीसुद्धा करू शकतो.” त्यानंतर ती हात न सोडता, मनगट फिरवून दाखवते. पुढे ती व्हिडीओमध्ये म्हणते, “हे चॅलेंज कदाचित महिला करू शकतील; पण पुरुषांना थोडं कठीण जाऊ शकतं.”
त्यानंतर ती व्हिडीओमध्ये एका व्यक्तीला बोलावते आणि त्याला हात न सोडता, मनगट फिरवून दाखवण्यास सांगते; पण दोन वेळा प्रयत्न करूनही तो अपयशी ठरतो. त्यानंतर ती व्हिडीओच्या शेवटी युजर्सना म्हणते, “ऑल दी बेस्ट! तुम्हीसुद्धा प्रयत्न करा”

Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises to mother in law
“माझी सासू माझा एक पाय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सासूबाईचं केलं कौतुक; म्हणाली, “माझ्या रुद्राजची ती यशोदा…”
dance of women on Zapukzhupuk
‘आरारारा खतरनाक…’ चाळीतल्या महिलांचा झापुक झुपूक गाण्यावर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

हेही वाचा : VIDEO : दोन तरुणींमध्ये रंगली डान्सची जुगलबंदी; दोघींनी केला जबरदस्त डान्स, व्हायरल होतोय व्हिडीओ

theshilpashetty या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, शिल्पा शेट्टी कुंद्रा फिटनेस चॅलेंज असा हॅशटॅग या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलाय.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी हे चॅलेंज पूर्ण केल्याचं कमेंटमध्ये सांगितलं आहे. एका युजरनं लिहिलंय, “१०० वेळा प्रयत्न केले; पण मला जमलं नाही”
शिल्पा शेट्टी खूप चांगली अभिनेत्री आणि निपुण डान्सर आहे. ती नियमित योगा करते आणि योगासनांमुळेच ती नेहमी आपल्याला फिट दिसते. ४८ वर्षांची शिल्पा शेट्टी अनेक तरुणी आणि महिलांना फिटनेससाठी प्रेरित करते.”

Story img Loader