मूळची शिमल्याची असलेल्या तिने आपण कधी ग्लॅमरस जगतात पाऊल ठेऊ असा विचारही केला नव्हता. मात्र नशीब आपल्याला कधी कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही. अगदी त्याचप्रमाणे मालविका चौहान-जोहाल या सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीने नुकताच मिसेस इंडिया अर्थ-फोटोजेनिकचा मान मिळवला आणि तिचा या क्षेत्रातला प्रवास सुरु झाला. नवीन आव्हाने स्वीकारण्याची तिची तयारी तिला कुठल्या कुठे घेऊन गेली. मागच्या आठवड्यात दिल्ली येथे झालेल्या मिसेस इंडिया अर्थ २०१७ मध्ये तिला अनपेक्षितपणे ‘अर्थ- फोटोजेनिक’चा किताब मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महिलांची मुक्ती म्हणजे नेमके काय? असा अंतिम प्रश्न तिला या स्पर्धेत विचारला गेला होता. यावर क्षणाचाही विलंब न लावता तिने अतिशय समाधानकारक उत्तर दिले होते. ”जेव्हा महिलांच्या डोळ्यात करारीपणा येईल, हृदयात ताकद येईल आणि आत्मविश्वास येईल तेव्हा त्या मुक्त झाल्या असे म्हणता येईल.” महिला कायमच आशावादी, सगळ्यांची समान काळजी घेणाऱ्या आणि याहूनही महत्त्वाचे त्या शरीरावरचे व्रण आपल्याला मिळालेल्या पदकांप्रमाणे समजणाऱ्या असतात.

मालविका म्हणते, आयुष्यात यापुढे येणाऱ्या आव्हानांसाठी मी उत्सुक आहे. मात्र कुटुंब आणि मित्रमंडळी यांच्याकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळेच मी इथंवर पोहोचू शकले. आता कुठं, माझा प्रवास सुरु झाला असून पुढे येणाऱ्या संधींसाठी मी कायमच तयार असेन. यापुढच्या काळात मी माझ्या आवडी जपण्याचा विशेष प्रयत्न करणार असल्याचेही ती म्हणाली. प्रियांका चोप्रा आणि सुश्मिता सेन या माझ्या सेलिब्रिटी रोल मॉडेल्स असल्याचे ती सांगते. माझे व्यावसायिक जीवन आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल साधण्याचा माझा कायम प्रयत्न असतो. महिला कायमच मल्टिटास्किंग असतात. येत्या काळात महिलांना सक्षम करण्यासाठी मी काही प्रयत्न करणार असल्याचेही ती म्हणाली. प्रत्येक महिला हे करु शकते असे मला महिलांना सांगावेसे वाटते. त्यासाठी फक्त तिचा स्वतःच्या सौंदर्यावर विश्वास असणे आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने काम करणे आवश्यक आहे.