Happy Shiv Jayanti 2025 Wishes : दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभरात साजरी केली जाते. शिवजयंतीच्या दिवशी देशभरात उत्सव साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जपणारे, त्यांच्यावर प्रेम करणारे शिवप्रेमी ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करतात, ढोल ताशाच्या गजरात महाराजांची मिरवणूक काढतात. काही शिवप्रेमी तर महाराजांच्या गड किल्ल्यांची स्वच्छता करतात. प्रत्येक जण या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने आनंद साजरा करताना दिसतो. या दिवशी प्रत्येकाच्या स्टेटसला शिवजयंती शुभेच्छा दिसून येतात. लोक एकमेकांना व्हॉट्सअॅप मेसेज किंवा स्टेटसद्वारे शिवजयंतीच्या शुभेच्छा देतात. आज आपण शिवजयंतीच्या हटके शुभेच्छा मेसेज जाणून घेणार आहोत .
किती राजे आले आणि किती राजे गेले
पण तुमच्या सारखे कोणी नाही…
छत्रपती शिवाजी महाराज की जय
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा

एक मराठा लाख मराठा
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा
सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!!!
इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर,
मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा,
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
जगातील एकमेव राजा असा आहे
ज्यांनी स्वतःसाठी एकही
राजवाडा महल नाही बांधला
तो राजा म्हणजे, छत्रपती श्री शिवाजी महाराज,
हे शिवराय प्रणाम तुम्हाला कोटी कोटी…!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

पावित्र्य तव राखिले स्वराज्यस्वप्न तव साकारिले… गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा शिवराजा तूज मानाचा मुजरा…
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस.. सिहांसनाधीश्वर.. योगीराज.. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग… देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ….
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

स्त्रित्रांचा जो ठेवितो आदर, ज्यास सहन न होई मराठ्यांचा अनादर त्या प्रत्येकामध्ये शिवभक्त दिसे ज्याच्या मनात शिवछत्रपती वसे
शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा !
निधड्या छातीचा, दणकट कणांचा मराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजा शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
बीज अंगी लखलखके ज्याच्या तो मर्द मराठा, तेज माथी चमकते ज्याच्या तो मर्द मराठा. भीमरूपी महाकाय जणू तो शोभे मर्द मराठा, माय भू तुला पुत्र म्हणूनी लाभे मर्द मराठा…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

वैकुंठ रायगड केला। लीक ती देवगण बनला । शिवराज विष्णू झाला। वंदन त्याला ।।
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !