गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील मोठ्या उत्सवांपैकी एक आहे. महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहात आणि जल्लोषात गणेशोत्सवात साजरा केला जातो. गणेशोत्सवातील दहा दिवस पुण्यातील वातावरण चैतन्य आणि उत्साह जाणवतो. पुण्यातील मध्यवर्ती पेठांमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये, चौकामध्ये विविध मंडळ बाप्पाची मूर्ती स्थापना करतात. कोणी फुलांची सुंदर सजावट करते तर कोणी सुंदर रोषणाई करते. कुठे उंच उंच देखावे उभारले जातात तर कुठे जिवंत देखावे सादर केले जात आहे. दरवर्षी कधी महाराष्ट्रातील शौर्य वीरांचा इतिहास किंवा पौराणिक कथांवर आधारित जिवंत देखावा सादर केला जातो. सध्या अशाच एका सुंदर जिवंत देखाव्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Video : पुणेकरांनो, आता घरबसल्या मानाच्या गणपतींचे घ्या दर्शन! एका क्लिकवर पाहा प्रसिद्ध गणपती मंडळाचे देखावे

यंदा पुण्यात शिव-पार्वती विवाह सोहळ्याचा जिवंत देखावा सादर केला जात आहे जो पाहण्यासाठी पुणेकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कैलास पर्वतावरील शिव-पार्वती विवाह सोहळ्याच्या या जिवंत देखाव्याचे कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, या पवित्र विवाह सोहळ्याला देवी-देवतांसह भगवान शिव यांचे भक्तगण देखील उपस्थित आहे. कधी भगवान शिवाचे तांडव नृत्य पाहायला मिळते तर कधी तपश्चर्या. कधी नारदमुनी सर्वांना शिव-पार्वतीच्या विवाह सोहळ्याचे आमंत्रण देताना दिसतात तर कधी विवाह सोहळ्यात अघोरी आनंदाने नाचत आहे.

हेही वाचा – Pune Video : पुण्यातील सर्वात सुंदर देखावा पाहिला का? साकारले पंजाबमधील सुंदर दुर्गियाना मंदिर, व्हिडीओ एकदा पाहाच

काही अघोरींनी गळ्यात कवट्यांची माळ घातलेली दिसत आहे तर काहींच्या अंगाला भस्म लावलेले आहे. एका अघोरीच्या तिसऱ्या डोळ्यातून आगीच्या ज्वाळा बाहेर येताना दिसत आहे. शिव-पार्वतीच्या विवाह सोहळ्यामध्ये हे अघोरी आनंदाने नाचताना दिसत आहे. कुठे नंदीच्या पाठीवर बसलेले महादेव दिसत आहे तर नवरीच्या रुपात नटलेली पार्वती देवी दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी मंत्रमुग्ध झाले आहेत. हा जिवंत देखावा पाहून प्रत्यक्षात शिव-पार्वती विवाह सोहळ्याला उपस्थित असल्याची अनुभवती प्रत्येकाला येत आहे.

शिव-पार्वती विवाह सोहळा हा पौराणिक देखावा पुण्यातील सदाशिव पेठ येथील नवजीवन मंडळाद्वारे सादर केला आहे. पेरुगेट येथील तात्यासाहेब करंदीकर रोड हा देखावा सादर केला जात आहे. हा जिवंत देखावा सादर करणाऱ्या कलांकराचा अभिनय उत्कृष्ट आहेत पण त्याचबरोबर त्यांच्या वेषभुषेने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मिडियावर या देखाव्याचे कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असले तरी प्रत्यक्षात शिव-पार्वती विवाह सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पुणेकर येत आहे.

हेही वाचा – ‘शापित पार्किंग क्षेत्र, विश्वास नसल्यास….!”, नो-पार्किंगमध्ये गाडी लावणाऱ्यांना पुणेकरांचा टोला; पुणेरी पाटी Viral

तुम्ही पाहिला का शिव पार्वती विवाह सोहळ्याचा जिवंत देखावा?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv parvati vivah sohala jivant dekhava shiv parvati wedding live spectacle in pune video goes viral ganesha festival 2024 snk