Shiv Thakare : ‘बिग बॉस मराठी’चा विजेता शिव ठाकरे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. लोकप्रिय हिन्दी रिॲलिटी शो “बिग बॉस” नंतर तो आता ‘खतरों के खिलाडी १३’ मध्ये दिसला. सोशल मीडियावर तो अनेक व्हिडीओ शेअर करत असतो. महाराष्ट्रसह देशभरात त्याचे चाहते आहे. इंस्टाग्रामवर त्याच्या चाहत्यांनी त्याच्या नावी अनेक अकाउंट सुरू केले आहे. या अकाउंटवरुन शिवसंबंधीत व्हिडीओ आणि फोटो शेअर केले जातात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिव ठाकरे त्याच्या चाहत्याची फिरकी घेताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की शिव ठाकरे चारचाकीमध्ये निवांत बसला आहे. तितक्यात एक चिमुकला त्याच्या गाडीच्या खिडकीजवळ येतो आणि त्याला म्हणतो की “तुम्ही मला बिगबॉसच्या शिवसारखे दिसता म्हणून मी आलो” त्यावर शिव त्याच्या चाहत्याची फिरकी घेत म्हणतो, “हो मला बरेच असे लोक म्हणतात की मी शिव सारखा दिसतो. मी नागपूरजवळचा आहे पण तिकडे मुंबईला राहतो.” त्यानंतर चाहता त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढतो तेव्हाही शिव ही त्याला गमतीदार प्रतिसाद देत फोटो व्हिडीओ काढण्यास परवानगी देतो.”
हेही वाचा : VIDEO : माकडाच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे वाचला मांजरीचा जीव; पाहाच एकदा व्हिडीओ …
shiv_the_shining_str या फॅन पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये शिवचे कौतुक करत लिहिले, “कोणी आपल्या चाहत्याबरोबर इतका गोंडस कसा वागू शकतो.. “
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, ” अरे त्याला खरं सांगितलं का? किती आनंदी झाला असता तू खरंच शिव आहे सांगितल्यावर” तर एका युजरने लिहिले, ” आत्मविश्वास बघा पोराचा” आणखी एका युजरने लिहिले, “म्हणून शिव भाऊ एवढा फेमस आहे कारण त्याच्या वागण्यात कधीही अहंकार दिसत नाही” अनेक युजर्सनी शिवच्या या गोंडस आणि निरागस चाहत्याचे कौतुक केले आहे.