“Shivgarjana Ganesh Visarjan video viral : छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेला सुख आणि शांतीने जगण्याचा अधिकार दिला. छत्रपती शिवाजी महाराज हे सुंस्कारी, युद्धशास्त्रात निपुण, उत्तम राजकारणी, न्यायशास्त्रात पारंगत आणि प्रजेच्या हिताचा विचार करणारे राजा होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोषासाठी एक घोषणा दिली जाते तिलाच शिवगर्जना असेही म्हणतात. आजही मंगलमयी प्रसंगी महाराजांचे स्मरण करून ही शिवगर्जना केली जाते. नुकताच राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी गणशे विसर्जन मिरवणूकीत एका चिमुकल्याने शिवगर्जना केली. या चिमुकल्याचा शिवगर्जना करताना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

चार वर्षांच्या चिमुकल्याने सादर केली शिवगर्जना

छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे आणि त्यांना मानणारे कित्येक लोक आहेत. अशाच एका शिवप्रेमी चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या चिमुकल्याचे नाव रेवांश असे असून त्याचे फक्त वय चार वर्ष आहे. इतक्या लहान वयातही त्याला शिवगर्जना तोंडपाठ आहे. विशेष म्हणजे हा चिमुकला संगमनेरमधील हिंदुजा प्रतिष्ठाण या ढोल ताशा पथकातील वादक आहे. गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान वादन सुरु करण्यापूर्वी रेयांशने शिवगर्जना केली.

Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Huppa Huiyya 2 announcement
ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
1.5-Year-Old's child Climb Up Tikona Fort!
Video : असे संस्कार प्रत्येक आईवडिलांनी करावे! दीड वर्षाच्या चिमुकल्याने सैर केला तिकोना किल्ला! व्हिडीओ एकदा पाहाच

हेही वाचा –पुणे तिथे काय उणे! ट्रॅक्टरवर चढून नाचल्या ७२ वर्षांच्या पुणेरी आजीबाई, Video तुफान Viral

पाहा Viral Video

हेही वाचा –मीठ अन् साखर नव्हे हा आहे पाण्यात विरघळणारा पदार्थ, रिक्षावरील पोस्टरमुळे रंगली चर्चा, पाहा Viral Post

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की त्यांनी आपल्या बोबड्या बोलीमध्ये कशाप्रकारे शिवगर्जना सादर केले आहे. “आस्ते कदम…आस्ते कदम…आस्ते कदम…महाराज….गडपती…गजअश्वपती…भूपती…प्रजापती…सुवर्णरत्न…श्रीपती…अष्टवधानजागृत…अष्टप्रधानवेष्टित..न्यायालंकारमंडित…शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत…राजनितिधुरंधर..,प्रौढप्रतापपुरंदर…क्षत्रियकुलावतंस…सिंहासनाधिश्वर….महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो.!” ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव असा जयघोष करता चिमुकला ताशाचे वादन सुरु करतो.

हेही वाचा –“पुणेकरांच्या नादाला लागू नये!”, पुलाच्या पदपथावर दुचाकी चालणार्‍यांना पुणेरी काकूंनी घडवली अद्दल, पाहा Viral Video

इंस्टाग्रामवर prince_revansh नावाच्या पेजवर चिमुकल्याचा हा गोंडस व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. रेयांशने शिवगर्जना करून नेटकऱ्यांची मने जिंकले आहे.

व्हिडीओ शेअर करत एकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आई वडिलांचे संस्कार म्हणजे काय असतात हे दाखवणारा हा आहे. संगमनेरमधला अवघ्या ४ वर्षांचा रेवांश. पार्वतीने जसं गणपतीला घडवलं तसंच या चिमुकल्याच्या आई वडिलांनी संस्कारक्षमपणे रेवांशला घडवलं. त्यामुळे आपण घडवू तशी आपली मुलं घडतात.”

आणखी एकाने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, “उच्चार स्पष्ट नसले तरी भावना अन् संस्कार ठळक आहेत.”

Story img Loader