Shivrajyabhishek Din 2023 Wishes: ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी १६७४ या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराय छत्रपती झाले.न भूतो न भविष्यति असा रायगडावर झालेला ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ ही हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेलेली घटना होती. या वर्षी तिथीनुसार २ जून या दिवशी आणि तारखेनुसार ६ जून रोजी राज्याभिषेकाला ३४९ वर्षे पूर्ण होऊन ३५० वे वर्ष सुरु होत आहे. अलीकडे कोणताही खास दिवस असला तरी त्याच्या शुभेच्छा या सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्याचा ट्रेंड आहे. मग उद्या तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत मानले जाणाऱ्या शिवछत्रपतींचा राज्याभिषेक दिनाचे निमित्त आहे त्यामुळे तुम्हा- आम्हासारख्या महाराजांच्या मावळ्यांना उत्साह असणारच हे निश्चित. तुम्हालाही उद्याच्या दिवशी Whatsapp Status, Facebook Post, Instagram Story वरून शिवराज्याभिषेक दिन विशेष HD फोटो शेअर करायचे असतील तर आजच ही शुभेच्छापत्र फ्रीमध्ये डाउनलोड करून ठेवू शकता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा