Chhatrapati Shivaji Maharaj Shivrajyabhishek Sohala Wishes: ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी १६७४ या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराय छत्रपती झाले. रायगडावर झालेला न भूतो न भविष्यति असा ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखंड हिंदुस्थानातील इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला. यंदा दरवर्षीप्रमाणे तारखेनुसार ६ जूनला राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष पूर्ण होत आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत मानले जाणाऱ्या शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक दिनी आपणही महाराजांचे विचार स्मरणात व आचरणात आणून त्यांना मानाचा मुजरा करू शकता. असं म्हणतात चांगले विचार हे वाटल्याने आणखी वाढतात त्यामुळे महाराजांचे विचार हे आपल्यापुरतेच मर्यादित न ठेवता खाली दिलेल्या शुभेच्छापत्रांच्या माध्यमातून तुमच्या मित्र व कुटुंबासह सुद्धा नक्कीच शेअर करू शकता. Whatsapp Status, Facebook Post, Instagram Story वरून शिवराज्याभिषेक दिन विशेष HD फोटो शेअर करायचे असल्यास आता लगेच हे खालील ग्रीटिंग्स मोफत डाउनलोड करा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा

रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस
मुघलांना वाटत होती ज्यांची भीती
असे आमचे शिवाजी राजे झाले आज ‘छत्रपती’
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!!
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा

शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा

मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
असा आमचा “राजा शिवछत्रपती”
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा

आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी…
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा

शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा

माझ्या राजाला दगडाच्या मंदिराची गरज नाही,
माझ्या राजाला रोज पुजाव लागत नाही,
माझ्या राजाला दुध-तुपाचा अभिषेक करावा लागत नाही,
माझ्या राजाला कधी नवस बोलावा लागत नाही,
माझ्या राजाला सोने-चांदीचा साज ही चढवावा लागत नाही,
एवढ असुनही जे जगातील अब्जवधी लोकांच्या
हृदयावर अधिराज्य गाजवतात असे एकमेव युगपुरुष..
‘छत्रपती शिवाजी महाराज’

राज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याला कुठेही गालबोट लागू न देता सर्वांना हा उत्साह साजरा करता यासाठी खूप खूप शुभेच्छा!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivrajyabhishek din 2024 wishes chhatrapati shivaji maharaj rajyabhishek din wishes quotes messages in marathi photos videos gif in marathi svs