“काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके” या आठ शब्दांमुळे महाराष्ट्रबरोबरच इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात अल्पवाधित लोकप्रिय झालेले सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील यांना या डायलॉगमुळे घरी मात्र रोषाला सामोरं जावं लागलंय. शहाजीबापू यांनीच एका मुलाखतीमध्ये यासंदर्भातील खुलासा केलाय.
नक्की पाहा >> Video: “पवारांसोबत गेलो तर…”, ‘झाडी, डोंगार, हाटील’ फेम आमदाराची तुफान फटकेबाजी; एकनाथ शिंदेंनाही हसू अनावर
“काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके” हे शब्द मागील काही दिवसांमध्ये अनेकदा तुमच्या कानावर पडले असतील किंवा एखाद्या मिस्मसच्या पेजवर वाचनात आले असतील. एकीकडे राज्यामध्ये शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्यापासून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असताना या शब्दांनी इंटरनेटवर एकच धुमाकूळ घातलेला. शहाजीबापूंच्या व्हायरल ऑडिओमधील हे शब्द तुफान व्हायरल झाले. शहाजीबापू पाटील यांच्या “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल” वाक्याची सध्या इतकी चर्चा आहे की यावरुन चक्क गाणीही तयार करण्यात आली आहेत. पण या ‘झाडी, डोंगार, हाटील’वालं वाक्य त्यांच्या पत्नीला फारसं रुचलं नाही असं शहाजीबाजूंनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.
नक्की वाचा >> भविष्यात शिंदे आणि ठाकरे एकत्र येतील का?; शहाजीबापू म्हणाले, “उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी, आदित्य हे सर्व आमदारांच्या…”
पत्नी रेखा पाटील या लोकप्रिय झालेल्या संवादावरुन आपल्यावर नाराज झाल्याचा खुलासा या मुलाखतीमध्ये शिवसेनेच्या या बंडखोर आमदाराने केला. झाडी, डोंगार, हाटील हा डायलॉग लोकप्रिय झाल्यानंतर कुटुंबियांची प्रतिक्रिया काय होती असं शहाजीबापूंना मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना शहाजीबापूंनी अगदी गावरान शब्दांमध्ये पत्नीने आपला समाचार घेतल्याचं सांगितलं.
नक्की वाचा >> “…म्हणून मी तेव्हा काय झाडी, काय डोंगार, काय हाटील असं म्हटलं”; शहाजीबापूंचा ‘तो’ किस्सा ऐकून एकच हस्यकल्लोळ
“घरात पाऊल टाकल्यावर तीने (पत्नी) काय ते बोलून राहीला डोंगार बिंगार, नीट राहाता येत नव्हतं का?,” असा प्रश्न विचारल्याचं शहाजीबापू म्हणाले. तसेच यावर आपण पत्नीला उत्तर दिल्याचंही त्यांनी सांगितलं. “नवरा जगाला माहीत झाला,” असं आपण तिला उत्तर दिल्याचं सांगोल्याचे आमदार असणाऱ्या शहाजीबापूंनी सांगितलं.