अखेरच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघावर एका धावेने मात करून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सामन्यानंतर मुंबई इंडियन्सने जल्लोष केला. विजयाचा आनंद अंबानींची सून श्लोका मेहताच्या चेहऱ्यावरही पाहायला मिळत होतं. श्लोकाने डान्स करत हा आनंद साजरा केला आणि त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या इतिहासात अनोख्या विक्रमाची नोंद केली. यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने २०१३, २०१५, २०१७ मध्ये आयपीएल चषक आपल्या नावे केलं होतं. त्यानंतर आता २०१९ मध्येही मुंबईने बाजी मारली आहे.

जवळपास दोन महिन्यांपूर्वी श्लोकाने आकाश अंबानीशी लग्नगाठ बांधली. मुंबईत धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नसोहळ्याला बॉलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली होती.