Shocking video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे कधी हसवणारे असतात कधी रडवणारे असतात तर कधी थरारक असतात. रोज आपल्या आजूबाजूला अनेक अपघात होत असतात यावेळी हे अपघात कधी समोरच्या व्यक्तीच्या चुकीमुळे होतात तर कधी स्वत:च्याच. असाच एक अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका महिलेच्या डोक्यावर टेरेसवरुन चक्क पाण्याची मोठी टाकी पडली आहे. हा अपघात फार भयंकर होता. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

तुम्हीच सांगा यात चूक कुणाची?

Ratan Tata Pet Dog came to pay him last tribute
मुक्या प्राण्याची माया! रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा पाळीव श्वान उपाशी, अंत्यदर्शनाचा भावुक करणारा Video
14th October Rashi Bhavishya In Marathi
१४ ऑक्टोबर पंचांग: इच्छापूर्ती की जिद्द-चिकाटी? पंचांगानुसार आज…
Govinda Hospitalized after Shooting Himself Accidently
अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून लागली गोळी, पत्नीने दिली प्रकृतीबद्दल माहिती
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची रतन टाटांशी भेट अन् मैत्री कशी झाली? वाचा
dominican republic citizenship
पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख!
Abhishek Bachchan Live Separate from Parents
“माझे आई-वडील जलसामध्ये राहतात, मी…”, अमिताभ बच्चन-जया बच्चन यांच्याबरोबर राहत नाही अभिषेक बच्चन
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अनेकदा आपण ऐकतो की कोणत्याही सोसायटीचा मेंटनन्स खूप महत्त्वाचा असतो. वरचे वर सर्व गोष्टी तपासणे, त्याचा पाठपुरावा करणे, दुरुस्त करणे अशी अनेक कामं करणे गरजेचं आहे. मात्र अनेक इमारतींमध्ये, सोसायट्यांमध्ये हे होताना दिसत नाही. जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जाते, मात्र त्याचे परिणाम नंतर फार गंभीर होऊ शकतात. याचाच प्रत्यय देणारी एक घटना सध्या समोर आली आहे. याचा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा यात नेमकी चूक कोणाची आहे?

नेमकं काय घडलं?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक साडी नेसलेली महिला रस्त्यावर उभी आहे. थोड्यावेळात ती रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी वळते आणि दोन पावलं पुढे जाताच टेरेसवरुन अचानक पाण्याची भलीमोठी टाकी महिलेच्या डोक्यात पडते. ही टाकी इतक्या जोरात महिलेच्या डोक्यात पडते की ती टाकी खालच्या बाजूने फुटते. त्यानंतर महिला खाली पडते आणि टाकीमध्येच अडकते. यावेळी हा जोरदार आवाज ऐकून एक व्यक्ती बाहेर येतो आणि महिलेला मदत करतो. महिला बाहेर येऊन उभी राहते मात्र तिलाही जोरदार याचा धक्का बसतो. ती घाबरलेली दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> देशी दारु अशी चढली की… बाईकवर बसलेल्या आजोबांनी काय केलं पाहा; Video पाहून हसाव की रडावं कळणार नाही

सोशल मीडियावर हा व्हिडीओ ashishsharma3865 ashishsharma3865 इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी या प्रकरणी सोसायटीच्या कमिटीला दोष दिला आहे.