Shocking Accident of young man: सध्या रस्ते अपघातांचं प्रमाण खूप वाढत चाललंय. त्यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. गाडी चालवताना नेहमी नियमांचं पालन करावं, हेल्मेट घालावं, फोनचा वापर करू नये, अशा सुरक्षिततेच्या सूचना अनेकदा देऊनही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव धोक्यात टाकतात. एक अपघात आपलं आयुष्य संपवू शकतो हेदेखील आजकालच्या पिढीला कळत नाही. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय; जो पाहून अंगावर अक्षरश: काटा येईल.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत एक तरुण आपल्या स्कूटरवरून येत असतो; पण त्याचं लक्ष रस्त्यावर नसून फोनमध्ये असतं. त्यावेळी समोरून एक कार येते जी आपल्या रस्त्याने जात असते. कार आपल्या मार्गिकेमधून जात असताना अचानक कारचालकाला दिसतं की, समोरून एक स्कूटरस्वार भरधाव येतोय. त्यामुळे कारचालक जोरात ओरडतो. हातात फोन पकडलेल्या स्कूटरचालकाच्याही ते लक्षात येतं; पण वेळ निघून गेलेली असते. कारण- दोघांमध्ये अंतर खूप कमी असतं. हातात फोन असल्यानं ब्रेक मारता येत नसल्यानं स्कूटर कारवर जोरात आदळते आणि तो स्वार खाली पडतो. त्यामुळे त्या स्कूटरस्वाराला गंभीर दुखापत होतेच; पण त्या कार आणि स्कूटरचंही नुकसान होतं.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
filght Footage
विमानात नको त्या अवस्थेत सापडले जोडपे! Video झाला व्हायरल, क्रू सदस्यांची चौकशी सुरू, नेटकऱ्यांचा संताप
bhandara Mobile phone explodes in pocket Principal died
धक्कादायक! दुचाकीरून जात असताना खिशातच मोबाईलचा स्फोट; मुख्यध्यापकाचा मृत्यू
a son fulfilled parents dream Parents sat on a plane for the first time in their life
आयुष्यात पहिल्यांदा विमानात बसले आईवडील , लेकाने केले स्वप्न पूर्ण; VIDEO होतोय व्हायरल
a girl ride met an accident after a guy appreciate her as a good rider
पापाच्या परीचं कौतुक करताच धाडकन आपटली; VIDEO होतोय व्हायरल
Scooter driver saved his life by removing battery from electric scooter viral video on social media
चालकाचा एक निर्णय आणि मृत्यू टळला! स्कूटरमधून निघाला धूर अन्…, पुढच्याच क्षणी जे घडलं ते पाहून बसेल धक्का, पाहा VIDEO

हेही वाचा… आधी ड्रेस खेचला मग बुक्क्यांनी मारलं! सरपंच पतीला गर्लफ्रेंडबरोबर पाहून पत्नीने घातला राडा, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं

व्हायरल व्हिडीओ

Original Video Link- https://www.instagram.com/reel/DCOyuHQsJ0o/

हा व्हायरल व्हिडीओ @siddharthbhadauria या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करणारा कारचालक असल्यानं त्याने ही संपूर्ण घटना कॅप्शनमध्ये लिहून नेमकं काय घडलं हे सविस्तर सांगितलं. “जर आमच्याकडे डॅशकॅम नसता, तर काय माहीत झालं असतं? आम्ही पूर्ण लक्ष देऊन आणि सुरक्षेची आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन गाडी चालवत होतो. वळणाच्या आधी अनेक वेळा हॉर्न वाजवत होतो. जेव्हा आम्ही वळणावर पोहोचलो तेव्हा, एक तरुण कानात इअरबड्स घालून गाणी ऐकत, फोनकडे पाहून आमच्या समोरून गाडी चालवत येत होता. परिस्थिती लक्षात येईपर्यंत तो घाबरला आणि त्याला नीट ब्रेकही लावता आला नाही. कारण- त्याच्या हातात फोन होता.”

“अपघातानंतर आम्ही त्वरित त्याच्या फोनवरून त्याच्या कुटुंबाला कॉल केला आणि त्याला जवळच्या ऑटोरिक्षात बसवून सुचवलेल्या हॉस्पिटलमध्ये नेले. आम्ही त्याला रुग्णालयात दाखल करून, त्याच्या वडिलांकडे सोपवले आणि कोणताही गैरसमज टाळण्यासाठी आमचे डॅशकॅम फुटेज त्याच्या वडिलांना शेअर केले. मी आणि माझे मित्र गाडीच्या आत सुरक्षित होतो; पण तो मुलगा इतका भाग्यवान नव्हता. त्याच्या मांडीचे हाड (फेमर) तुटले होते आणि त्याचे मनगट फ्रॅक्चर झाले होते.”

हेही वाचा… हे फक्त आईच करू शकते! चिमुकली रस्त्यावर पळत सुटली अन्…, पुढच्याच क्षणी आईने जे केलं ते पाहून मातृत्वाला कराल सलाम

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी आपल्या धक्कादायक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “मला आशा आहे की, स्कूटरचालकाला यातून चांगलाच धडा मिळाला असेल.” दुसऱ्यानं, “तो जिवंत तरी आहे का?” अशी विचारणा केली. तर, एक जण कमेंट करीत म्हणाला, “गाडी चालवताना फोन बघणार, तर असंच होणार.”

Story img Loader