Accident Viral video: सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये बरेचसे व्हिडीओ हे अपघातांचे असतात. रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे अपघात कधी समोरच्या चालकाच्या चुकीनं होतात, तर कधी स्वत:च्या चुकांमुळे होतात. बहुतेक वेळा यात तुम्ही चालत्या गाड्यांमध्ये टक्कर झाल्याचं, एखादी गाडी अनियंत्रित झाल्याचं, गाडी पुलावरून खाली कोसळल्याचं किंवा गाडीला आग लागल्याचं, गाडीखाली कुणीतरी चिरडल्याचं पाहिलं असेल. पण, असे अपघात चालत्या गाड्यांमध्येच होतात, असे नाही; तर एखादी रस्त्याच्या शेजारी उभी केलेली गाडीही जीवघेणी ठरू शकते. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या एका गाडीमुळे भयंकर अपघात झाला आहे. हा व्हिडीओ बघून तुम्हीही यापुढे गाडी चालवताना काळजी घ्याल. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे; जो पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला हवे ते दाखवत आहे.

Accident Viral Video
VIDEO : ‘त्या चिमुकल्याची काय चूक होती?’ भरधाव कारची दुचाकीला धडक; चिमुकला अक्षरश: कोसळला, काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Young Man Breaks Down in Tears Over Girlfriend's Photo in New Car
Video : देवाघरी गेलेल्या प्रेयसीचा फोटो नवीन कारमध्ये ठेवला अन् ओक्साबोक्शी रडला, तरुणाचा व्हिडीओ पाहून व्हाल भावुक
Emotional video of father running behind train to earn money hardwork video viral
एका बापाची मजबुरी! प्लॅटफॉर्मवरून उडी मारली, ट्रेनच्या मागे धावत सुटला अन्…; ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी
Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
Railway crossing accident See what happened next when the entire dumper overturned on the car video goes viral
“संपत्ती प्रामाणीकपणाची असेल तर देवही रक्षण करतो” संपूर्ण डंपर कारवर पलटी होणार तेवढ्यात काय घडलं पाहा; VIDEO व्हायरल
Bike Rider Teach Lesson To Bus Driver
‘म्हणून शिक्षण महत्वाचे…’ रस्त्याच्या मधोमध थांबून त्याने बस चालकाला घडवली अद्दल; हाताची घडी घातली अन्… पाहा VIDEO चा शेवट
Accident video viral where Speedy Bus hit the man shocking video on social media
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; बसने दिली धडक, टायरखाली येणार इतक्यात…, पुढच्याच क्षणी काय झालं पाहा

कारचा दरवाजा उघडला आणि झाली भयंकर दुर्घटना

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या आहेत; तर काही गाड्या रस्त्यावरून धावत आहेत. याच रस्त्यावर एका कडेला कार उभी आहे. दरम्यान या कारचालकानं बाहेर न बघता, अचानक कारचं दार उघडलं. यावेळी रस्त्यावरून जात असलेला एक दुचाकी चालक नेमका येतो आणि मोठा अपघात येतो. हा अपघात इतका भयानक होता की, दुचाकीचालक अक्षरश: कारला धडकून दुसऱ्या गाडीखाली येतो. कारचालकाचा हा हलगर्जीपणा दुचाकी चालकाच्या जीवावर बेतला.

धडकी भरवणारा VIDEO

या अपघातात हा दुचाकीचालक जखमी झाला. कारचा दरवाजा उघडताना आजूबाजूला पाहणं किती गरजेचं आहे हे या अपघातावरून कळतंय. सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. त्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी तुम्ही सदैव सावध राहणं हा एकच उपाय आहे. मागे-पुढे न पाहता कारचा दरवाजा उघडणं यात अनेकांना काहीच चूक वाटत नाही. पण, हीच गोष्ट कुणाच्या तरी जीवावर बेतू शकते. त्यामुळे ही चूकच नाही, तर मोठा गुन्हाच आहे, असंच म्हणावं लागेल. त्यामुळे कारचा दरवाजा उघडताना सावध राहा आणि अशा दुर्घटना टाळा

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> भरधाव वेगानं जाणाऱ्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात; नेमकं कुठे चुकलं तुम्हीच सांगा; थरारक VIDEO होतोय व्हायरल

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. @gharkekalesh या पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला हजारोंमध्ये लाइक्स मिळत आहेत. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही नेटकरी देत आहेत.

Story img Loader