सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये बरेचसे व्हिडीओ हे अपघाताचे असतात. रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्येही हे अपघात कधी समोरच्या चालकाच्या चुकीनं होतात तर कधी स्वत:च्या चुकांमुळे होतात. असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून तुम्हीही या पुढे गाडी चालवताना काळजी घ्याल. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर गाड्या ये जा करत आहेत. याच रस्त्यावर एका कडेला कार उभी आहे. याच दरम्यान या कार चालकाने बाहेर न बघता अचानक कारचं दार उघडलं. यावेळी रस्त्यावरुन जात असलेला एक दुचाकी चालक नेमका येतो आणि मोठा अपघात येतो. हा इतका भयानक अपघात होता की दुचाकी चालक अक्षरश: कारला धडकून दुसऱ्या गाडीखाली येतो. कार चालकाचा हा हलगर्जीपणा दुचाकी चालकाच्या जीवावर बेतला.
या अपघातात हा दुचाकी चालक जखमी झाला असून कारचा दरवाजा उघडताना आजूबाजूला पाहणं किती गरजेचं आहे हे कळतंय. सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @ seemakanojiya87 या पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.