Shocking accident vashi navi mumbai video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, जो पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालविण्याचा प्रयत्न केला, तरी समोर कोणी चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवत असेल, तर अपघात हे होतातच. अशा वेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते. त्यामुळे प्रत्येकानं व्यवस्थित गाडी चालवली पाहिजे. असाच भयंकर अपघात नवी मुंबई येथील वाशीमधून समोर आला आहे. यामध्ये ट्रकचा टायर फुटला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अपघातानंतर आजूबाजूच्या गाड्यांची अवस्था पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.गाडी चालवताना वेगावर मर्यादा ठेवा असा सल्ला वारंवार दिला जातो. कारण वेग जास्त असेल तर गाडीवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता असते. अन् त्यामुळे गंभीर अपघात देखील घडू शकतात. मात्र तरी देखील काही अतिउत्साही लोकं वाऱ्याच्या वेगानं ओव्हरटेक करायला जातात, पण शेवटी त्यांच्यासोबत काय घडतं हे आता तुम्हीच पाहा.

झालं असं की एका ट्रकचा टायर फाटला, यावेळी याचा वेग इतका होता की शेजारी असलेल्या रिक्षाच्या अक्षरश: चिंधड्या झाल्या. ही रिक्षा संपूर्ण उडाली असून रिक्षाचा फक्त सापळा शिल्लक आहे.तुम्हाला माहितीच आहे ट्रकचा टायर किती मोठा असतो यावेळी हा जर फुटला तर आजूबाजूच्या वाहनांचं काही खरं नाही. म्हणूनच मोठ्या अवजड वाहनांपासून सुरक्षित अतंर ठेवूनच गाडी चालवण्याचं आवाहन केलं जातं.

पाहा व्हिडीओ

टायर फुटण्याची शक्यता ही मुख्यत्वे टायरची गुणवत्ता, स्थिती, रस्त्याची स्थिती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वेग यावर अवलंबून अशते. ज्यावेळी तुमच्या वाहनाची वेगमर्यादा ही १२० ते १३० ताशी किमी यापेक्षा जास्त होते त्यानंतर टायरचे तापमान वेगाने वाढते. ज्याचा परिणाम टायरच्या रबरवर होतो आणि रबर कमकुवत होऊ शकतो. त्यामुळे टायर उडण्याची शक्यता वाढते. टायरमध्ये जास्त हवा भरलेली आहे तर जास्त दाबामुळे टायरचा पृष्ठभाग पातळ होतो आणि जास्त वेगामुळे टायर फुटू शकतो. टायर जुना अथवा जीर्ण झाला असल्यास अश्या जुन्या आणि जीर्ण टायरमध्ये वेग हाताळण्याची क्षमता ही फार कमी असते त्यामुळे जास्त वेगात वाहन चालवल्यास टायर फुटू शकतो.