Bike Hit Scorpio Video : सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील अनेक व्हिडीओ हे खरंच थरकाप उडवणारे असतात, जे पाहतानाही काळजात धडकी भरते. अनेकदा अपघाताच्या अशा घटना पाहिल्यानंतर रस्त्यावरून वाहन चालवितानाही मनात तेच विचार येत राहतात. त्यात अनेकदा चालकाला निष्कारणच समोरच्या वाहनचालकाच्या चुकीमुळे अपघाताचे बळी ठरावे लागते. त्यामुळे कितीही ठरवून सुरक्षित वाहन चालवले तरी अपघात टाळणे कठीण होते. सध्या असाच एका भयंकर अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. या अपघाताच्या घटनेत एका भरधाव बाईकस्वाराने कशा प्रकारे स्कॉर्पिओला धडक दिली अन् यानंतर असे काही घडले की, ते एका चमत्कारापेक्षा कमी नव्हते. नेमकं या घटनेत काय घडलं? यात नेमकी चूक कोणाची होती, याबाबत जाणून घेऊ…
रस्त्यावरून वाहन चालविताना सावधगिरी बाळगणे फार गरजेचे असते; पण अनेकदा चूक नसतानाही आपण अपघाताचे बळी ठरतो. या घटनेतही नेमके तेच झाले. एका भरधाव बाईकस्वाराने रस्त्यावर टर्न घेणाऱ्या स्कॉर्पिओ कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बाईकस्वार हवेत उडून स्कॉर्पिओवर आदळला; पण यानंतर असे काही घडले की, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
बाईकस्वाराची स्कॉर्पिओला जोरदार धडक अन् घडलं भयानक
Y
व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, रस्त्यावरून वेगाने वाहने जात आहेत. याच वेळी एक स्कॉर्पिओ कार रस्त्याच्या मधे येऊन थांबते. यावेळी समोरून येणारी कार पाहून चालक योग्य वेळी गाडी वळवत असतो. पण, याचदरम्यान एक बाईकस्वार भरधाव आला आणि त्याने थेट स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बाईकस्वार हवेत उडून थेट कारच्या बोनेटवर आदळला; पण इतक्या भीषण अपघातात बाईकस्वाराला मात्र कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. तो सुखरूप राहिला. ही घटना एका चमत्कारापेक्षा कमी वाटत नाही. कारण- इतक्या भयंकर अपघातानानंतरही बाईकस्वार किंव कारचालकही सुखरूप आहे.
“तुला माहितीये का मी कोण”, विनातिकीट प्रवाशाची धमकी, टीटीईने काही क्षणांत उतरवला माज; video viral
अपघातचा हा व्हिडीओ @introvert_hu_ji नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर एका युजरने लिहिलेय की. कोणतीही दुखापत झाली नाही हे चांगले आहे; अन्यथा अशा अपघातात जीव जाऊ शकतो. दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, नशीब त्याच्या बाजूने होते; अन्यथा त्याचा मृत्यू निश्चित होता. तिसऱ्या युजरने लिहिले की, भाऊ! काय गंभीर अपघात आहे हा. अशा प्रकारे इतर अनेक युजर्सनीही यावर कमेंट्स करून, आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.