Stunt video viral: सोशल मीडियावर सतत नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत राहतात. मात्र, यात सगळ्यात जास्त पसंती स्टंट व्हिडिओला मिळते. स्टंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच व्हायरल होतात. स्टंटचे हे व्हिडिओ बहुतेक लोकांचं लक्ष वेधून घेतात आणि लोक हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअरही करतात. मात्र, अनेकदा स्टंट करत असताना भलत्याच घटना घडतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या तर तरुणांमध्ये स्टंटची प्रचंड क्रेझ वाढल्याचं पाहायला मिळत आहे. सगळ्यांनाच स्टंट करून सोशल मीडियावर प्रसिद्ध व्हावं असं वाटतं, पण स्टंटबाजी हा लहान मुलांचा खेळ नाही, त्यासाठी खूप सराव करावा लागतो. हे लोकांनी समजून घ्यायला हवं. खूप सरावानंतरही तुम्ही हे स्टंट करू शकता. पण काही लोक असे आहेत, जे प्रसिद्धी मिळवण्यासाठी वेगळं काहीतरी करण्याच्या नादात कुठेही स्टंट करू लागतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडिओही असाच आहे. यात एक तरुण चक्क आपल्या घराच्या छतावर कार चालवण्याचा प्रयत्न करत आहे.

गाडीचा अक्षरशः चक्काचूर

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, इतका मोठा अपघात होईल अशी जराही कल्पना या तरुणांना नसताना हा अपघात झाला आहे. घराच्या एका छतावरुन दुसऱ्या छतावर कार घेऊन जाताना मध्येच अंदाज चुकला आणि तरुण कारबरोबर खाली कोसळला. यामध्ये कारचा संपूर्ण चुरा झाला आहे. तुम्ही पाहू शकता, पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं. मात्र, सुदैवाने कार चालवणारा व्यक्ती बचावला. व्हिडीओ बघताना अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कारचा वेग, योग्य प्लॅनिंग चुकल्यामुळे हा अपघात झाल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

हेही वाचा << उंच इमारतीच्या छतावर करत होता स्टंट; अचानक तोल गेला अन्…हृदयाचा ठोका चुकवणारा Video viral

कारण स्टंट दाखवणं हा लहान मुलांचा खेळ नाही, ज्यासाठी खूप मेहनत करावी लागते, खूप सराव आवश्यक असतो. त्यामुळे उत्साहाच्या भरात प्रसिद्धीसाठी असे प्रकार न करण्याचं आवाहन केलं जात आहे. हा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking accident happen while doing car stunt on building terrace video viral on social media srk