रस्त्यावरून जाताना तुम्ही जेवढे सावध व्हाल तेवढे कमीच आहे. तुम्ही सोशल मीडियावर नक्कीच रस्ते अपघाता संदर्भात अनेक व्हिडीओ पाहिले असतीलच. ज्यामध्ये कधी समोरच्याच्या चुकीमुळे तर कधी स्वत: चालकाच्या चुकीमुळे मोठमोठे अपघात झाले आहेत. दरम्यान जन्म आणि मृत्यू कोणाच्याच हातात नाही. मृत्यू कधी, कसा आणि कोणाला गाठेल हे सांगू शकत नाही. माणसाच्या आयुष्याचा एका सेकंदाचाही भरवसा राहिलेला नाही. याचाच प्रत्यय देणाऱ्या एक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये गाडी चालवणाऱ्या माणसाचे अक्षरश: दोन तुकडे झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
Video पाहून उडेल थरकाप
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वरदळीचा रस्ता आहे, अनेक जण या रस्त्यावरुन वाहतूक करत आहेत. अनेक गाड्या ये जा करत आहेत. अशातच रस्त्याच्या बाजूला लावलेला एक होर्डींग रस्त्यावरुन जात असलेल्या दुचाकीस्वारावर पडतो. काही कळायच्या आतच या दुचाकीस्वाराचे जागीच २ तुकडे होतात. होर्डींगच्या पत्र्याने या व्यक्तीच्या शरीराचे दोन तुकडे होतात. या व्यक्तीची काहीच चुकी नसताना या व्यक्तीचा बळी गेला. हा सर्व प्रकार एका सिसिटिव्ही कॅमेरात कैद झालाय.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/CssjS-xNRVd/?igshid=NjZiM2M3MzIxNA==
हेही वाचा – तो आला, बाईकवरुन उतरला अन् अचानक दिसेनासा झाला! विचित्र अपघाताचा Video व्हायरल
हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचाही चांगलाच थरकाप उडाला आहे. तसेच व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज गेले आहेत. नेटकऱ्यांनी व्हिडीओवर बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत.