Viral video: मित्रांचं आपल्या आयुष्यात एक वेगळंच स्थान असतं. आनंद, दुःख किंवा आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी मित्र मदत करतात. मात्र, अनेकदा मित्र अशी मस्करी करतात जे पाहून सगळेच हैराण होतात. अनेकदा लोक मस्करीच्या नादात असं काहीतरी करतात की समोरच्याच्या डोळ्यात अश्रू येतात. अशा वेळी दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है या ओळी आठवतात. याला कारणही तसंच आहे. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही मित्रांनी त्यांच्या मित्रासोबत अशी भयानक मस्ती केली, ज्यामुळे त्याचा जीवच धोक्यात आला आहे.

काही मुलांनी त्यांच्या एका मित्राला एका मोठ्या टायरमध्ये बसवलं. त्यानंतर हा टायर उतारावरून खाली ढकलला. उतारामुळे टायर वेगाने खाली जाऊ लागला आणि गोल गोल फिरुन त्यात बसलेल्या तरुणाचीही अवस्था खराब होऊ लागली. तरूणांना वाटलं की टायर सरळ मार्गावर जाईल आणि काही अंतरावर जाताच ते तो थांबवतील. मात्र, काहीतरी वेगळंच घडलं. सोबतच्या मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली मात्र त्याला खूप उशीर झाला होता. कुणालाही वेगात खाली चाललेला टायर थांबवता आला नाही. दरम्यान टायरमधल्या तरुणाचं पुढे काय झालं याची काही कल्पना नाही. मात्र तुम्ही ही बातमी वाचत असाल तर एक लक्षात घ्या अशी मस्करी किंवा मस्ती तुम्ही करु नका.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – ‘तू मोठ्यानं ढेकर का देतेस’ महिलेनं ढेकर दिला म्हणून शेजाऱ्यांमध्ये हाणामारी, प्रकरण पोहचलं थेट पोलिसात

अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं, सगळ्यांचे मित्र असेच असतात. तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, मित्र कधीच सुधरणार नाहीत. आणखी एकानं कमेंट करत म्हटलं की देव असे मित्र कोणाला देवू नये. या व्हिडीओला ४ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले असून हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे

Story img Loader