Viral video: मित्रांचं आपल्या आयुष्यात एक वेगळंच स्थान असतं. आनंद, दुःख किंवा आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी मित्र मदत करतात. मात्र, अनेकदा मित्र अशी मस्करी करतात जे पाहून सगळेच हैराण होतात. अनेकदा लोक मस्करीच्या नादात असं काहीतरी करतात की समोरच्याच्या डोळ्यात अश्रू येतात. अशा वेळी दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है या ओळी आठवतात. याला कारणही तसंच आहे. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही मित्रांनी त्यांच्या मित्रासोबत अशी भयानक मस्ती केली, ज्यामुळे त्याचा जीवच धोक्यात आला आहे.
काही मुलांनी त्यांच्या एका मित्राला एका मोठ्या टायरमध्ये बसवलं. त्यानंतर हा टायर उतारावरून खाली ढकलला. उतारामुळे टायर वेगाने खाली जाऊ लागला आणि गोल गोल फिरुन त्यात बसलेल्या तरुणाचीही अवस्था खराब होऊ लागली. तरूणांना वाटलं की टायर सरळ मार्गावर जाईल आणि काही अंतरावर जाताच ते तो थांबवतील. मात्र, काहीतरी वेगळंच घडलं. सोबतच्या मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली मात्र त्याला खूप उशीर झाला होता. कुणालाही वेगात खाली चाललेला टायर थांबवता आला नाही. दरम्यान टायरमधल्या तरुणाचं पुढे काय झालं याची काही कल्पना नाही. मात्र तुम्ही ही बातमी वाचत असाल तर एक लक्षात घ्या अशी मस्करी किंवा मस्ती तुम्ही करु नका.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – ‘तू मोठ्यानं ढेकर का देतेस’ महिलेनं ढेकर दिला म्हणून शेजाऱ्यांमध्ये हाणामारी, प्रकरण पोहचलं थेट पोलिसात
अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं, सगळ्यांचे मित्र असेच असतात. तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, मित्र कधीच सुधरणार नाहीत. आणखी एकानं कमेंट करत म्हटलं की देव असे मित्र कोणाला देवू नये. या व्हिडीओला ४ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले असून हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे