Accident Video : सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की अंगावर काटा येतो. रस्ता ओलांडताना अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते. अनेकदा लहान मुले रस्ता ओलांडताना नीट बघत नाही. त्यामुळे रस्ता ओलांडताना अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये भरधाव वेगाने धावणारी कार पायी चालणाऱ्या कुटूंबातील तीन जणांना धडक देताना दिसत आहे. हा अपघाताचा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. हा व्हिडीओ नेमका कोणत्या शहरातील आहे, याविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही.
या व्हायरल व्हिडीओ एका रस्त्यावरील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका कुटूंबातील दोन महिला आणि एक चिमुकली झेब्रा क्रॉसिंगवरुन रस्ता ओलांडत आहे. अचानक भरधाव कार येते आणि या पायी चालणाऱ्या कुटूंबातील तिघांनाही उडवते. या कार चालकाचे वेगावर नियंत्रण नसते त्यामुळे हा अपघात घडतो. हा अपघात पाहून तेथील लोक मदतीला धावतात त्यानंतर व्हिडीओ संपतो. या कुटूंबासंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा थरारक अपघात सीसीटिव्ही कॅमऱ्यात कैद झाला आहे.
हे कुटूंब झेब्रा क्रॉसिंगवरुन रस्ता ओलांडताना दिसत आहे. हे झेब्रा क्रॉसिंग रस्ता ओलांडण्यासाठी असते. झेब्रा क्रॉसिंग दिसताच चालकाला वेग कमी करावा लागतो. चालकांनी नेहमी पायी चालणाऱ्या म्हणजेच पादचाऱ्यांना रस्ता द्यावा पण हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
GoreFights या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एका कारने कुटूंबाला धडक दिली” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे. काही युजर्सनी कार चालकावर रोष व्यक्त केला आहे तर काही युजर्सनी या कुटूंबाची चूक असल्याचे लिहिलेय आहे. एका युजरने लिहिलेय, “रस्ता ओलांडण्यापूर्वी कुटूंबाने नीट पाहायला पाहिजे होते”