Viral Video : सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भरधाव वेगाने बाईक चालवणाऱ्या तरुणाचा भयानक अपघात झालेला दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. हल्ली तरुण मंडळी भरधाव वेगाने वाहने चालवताना दिसतात.अशात अपघाताचे प्रमाण अधिक वाढले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की असेच वेगाने बाईक चालवणे एका तरुणाच्या जीवावर कसे बेतले.
या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक तरुण बाईक चालवताना दिसत आहे. हा तरुण भरधाव वेगाने रस्त्यावरुन बाईक चालवताना दिसत आहे. त्याची बाईक इतक्या वेगाने असते की समोर जाऊन चारचाकीला धडकते. धडकल्यानंतर तो बाईकवर बेशुद्ध पडतो. तरीसुद्धा बाईक कमी वेगाने चालत असते.व्हिडीओत पुढे दिसते की मागून एक ट्रक येतो आणि या बाईकला पुन्हा धडक देतो. या धडकेत हा तरुण चिरडला जातो आणि व्हिडीओ बंद होतो. हा व्हिडीओ पाहून तु्म्हालाही चांगलाच धक्का बसेल. वेगाने गाडी चालवणे किती महागात पडू शकते, हे तुम्हाला या व्हिडीओतून दिसून येईल.
वाहने हळू चालवा, आवरा वेगाल सावरा जीवाला अशा सुचना तुम्ही अनेकदा वाचल्या असतील. अतिशय वेगाने वाहने चालवल्यामुळे चालकाचे वेगावर नियंत्रण राहत नाही आणि असे अपघात घडतात. त्यामुळे वाहने वेगाने चालवू नये किंवा चालवताना कोणतीही स्टंटबाजी करू नये. हा व्हिडीओ तुम्ही नीट पाहाल तर हा तरुण अति वेगाने बाईक चालवून स्टंटबाजी करण्याचा प्रयक्न करत होता.
हेही वाचा : Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात बसवले १४ सोन्याचे दरवाजे, फोटो आले समोर
@JOEPEXAR0 या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तरुण कारला धडकतो आणि ट्रक खाली चिरडतो.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तो जीवंत आहे” तर एका युजरने लिहिलेय, “हा मुर्खपणाचा खेळ आहे”