सावधानी हटी, दुर्घटना घटी हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकले असेल. यासोबतच याची उदाहरणे तुम्ही अनेकदा पाहिली असतील. रस्त्यावर वाहन चालवणे हे अत्यंत जोखमीचे काम आहे. याआधी आपण अनेक अपघाताचे व्हिडीओ पाहिले असतील, जे अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. तसेच रस्ता रिकामा असला तरी वाहन चालवताना काळजी घेणे किती आवश्यक आहे. हे सुद्धा हा व्हिडीओ बघून तुम्हाला कळेल. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.
“दुर्घटना से देर भली” रस्त्यावर आपण अनेकवेळा हे बोर्ड, सूचना लावलेले फलक पाहिले असतील, पण प्रत्यक्षात प्रत्येक जण हा घाईत असतो. अशाच घाईमुळे एक भंयकर अपघात झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रिकाम्या रस्त्यावर झालेल्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा अपघात रात्रीच्या सुमारास घडला. रिकाम्या दिसणार्या रस्त्यावर एका कार चालकाने गाडी थोडी दूर नेऊन पार्क केली. यानंतर समोरून येणार्या ट्रकचा तोल सुटला आणि तो कारवर कोसळला. संपूर्ण कार ट्रकखाली जाऊन कारचा चेंदामेंदा झाला.
या कारमध्ये असलेल्या ड्रायव्हर किंवा इतर लोकांचं काय झालं असेल याची आपण कल्पनाही करु शकत नाही. त्यामुळे गाडी चालवताना रिकामा रस्ता असला तरी, आजूबाजूला लक्ष दिलं पाहिजे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – ॲमेझॉनवरुन मागवली ९० हजारांची कॅमेरा लेन्स आणि आल्या ‘या’ बिया, तक्रार करताच कंपनीनं दिलं ‘हे’ उत्तर
रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा व्हिडिओ कैद झाला आहे. कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला. रिकामा रस्ता पाहून त्याने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. समोरून येणा-या ट्रकने कार जवळ गेल्यावर ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र थांबण्यापूर्वीच ट्रक पलटी झाला.