Shocking video: वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. ओव्हरटेकिंग किंवा लेन कटिंगमुळेही बरेच अपघात होतात. काही जणांना अतिआत्मविश्वास नडतो; तर काही जणांचा अंदाज चुकतो. असाच एक अपघात सध्या समोर आला आहे ज्यामध्ये बसतं नियंत्रण सुटल्यानं भयंकर अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.
आपल्या आयुष्यात कधी कोणती घटना घडेल याचा काहीच भरवसा नाही. आयुष्यात सुख-दु:खाचे क्षण हे येत असतात. आपल्याला प्रत्येक वेळी सामोरं जाणं हाच एक त्यामागे मार्ग असतो. पण सुखाच्या क्षणांचं क्षणार्धात एखाद्या दुर्घटनेत बदल होणं म्हणजे दुर्दैव! अशा दुर्घटना अनेकदा बघायला मिळतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भाजा आणि फळांचं दुकान याठिकाणी दिसत असून ग्राहक फळं आणि भाजा विकत घेत आहेत. यावेळी एक व्यक्ती त्याठिकाणी येतो आणि पुढच्याच क्षणी समोरुन भरधाव वेगात बस येते आणि त्या गाडीवर बसलेल्या व्यक्तीला तसेच फळ विक्रेत्याचं दुकान आणि ग्राहकांना अक्षरश: चिरडून टाकते. एका क्षणात या सगळ्या गोष्टी होतात. या व्हिडीओवरुन कधी काय होईल याचा नेम नाही हे लक्षात येत आहे.
तुम्ही कितीही सावधगिरी बाळगली तरीदेखील अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात घडतात. प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं आहे. असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्यालाही माहिती आहे, कारण मृत्यू कुणाच्या हातात नाही. अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालविण्याचा प्रयत्न केला, तरी समोर कोणी चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवत असेल, तर अपघात हे होतातच. अशा वेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते. सध्या समोर आलेल्या प्रकरणातही असंच काहीसं घडलं आहे.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DIB0xPtI-mZ/?utm_source=ig_web_copy_link
सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात, ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. vishu_sambare_9132 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये, “कधी काय होईल सांगता येत नाही म्हणून आहे तोपर्यंत आनंदाने जगा” असं लिहलं आहे. हा व्हिडीओ लोक वारंवार पाहत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.