Car Accident Video : सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडिओ समोर येतात. काही व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो तर काही व्हिडिओ थरकाप उडवणारे असतात. रस्ते अपघातात आजवर अनेकांनी जीव गमावले आहेत तरीसुद्धा लोक सतर्कतेने वाहन चालवत नाही.
सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एका दुचाकीला धडक देऊन चारचाकी कार भररस्त्यात पलटी झाली. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एका फळ विक्रेत्याच्या दुकानात काही ग्राहक फळ खरेदी करताना दिसेल. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की अचानक डाव्या बाजूने कार येते आणि कारसमोर आलेल्या दुचाकीला धडक लागू नये म्हणून कार थोडी बाजूला वळवण्याचा प्रयत्न करते पण कार पुन्हा दुसऱ्या दुचाकीला जोरात धडक देते पलटी होते. दुचाकी चालक दुचाकीसह खाली पडतो पण सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत होत नाही. मात्र कार पलटी होताच आजूबाजूचे लोक धावत येतात आणि कारला सरळ करण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर कारमध्ये बसलेल्या लोकांना बाहेर बाहेर काढतात. कारमध्ये कारचालक शिवाय आणखी कोण होते याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : बाप की हैवान! घरात पेट घेताच लहान मुलाने घेतली वडिलांकडे धाव; पण…, पालकांच्या दुर्लक्षामुळे झालं असं काही की, VIDEO पाहून बसेल धक्का

पाहा व्हायरल व्हिडीओ

Ghar ke kalesh या एक्स अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दुचाकीला धडक दिल्यानंतर कार रस्त्यावर पलटी झाली.

हेही वाचा : “प्लिज, थांबवा हे आता”; मेट्रोमध्ये तरुणीने तमन्ना भाटियाच्या ‘आज की रात’ गाण्यावर केला डान्स, Viral Video पाहून संतापले नेटकरी

या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कोणाची चूक आहे?” तर एका युजरने लिहिलेय, ” यात चूक कोणाची आहे हेच कळले नाही.” आणखी एका युजरने लिहिलेय, “दुचाकी चालकालाही कोणीतरी विचारा की त्याला दुखापत झाली का? किती विचित्र अपघात घडला.” एक युजर लिहितो, “मला आशा आहे सर्वजण सुरक्षित असेल.” तर एका युजर लिहितो, “मला हा अपघात सिंघम चित्रपटातील एखाद्या सीन सारखा वाटला”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking accident video car rolled out on road after hitting the bike video goes viral ndj