Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक लाइव्ह अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. यामध्ये कार चालवायला शिकणाऱ्या तरुणाने पाच जणांना चिरडले. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.

ही घटना हरियाणामध्ये घडली असून, हरियाणातील कैथल जिल्ह्यात एका व्यक्तीने कारमध्ये पाच जणांना चिरडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिका धान्य बाजारात शनिवारी ही घटना घडली. जिथे कार चालवायला शिकणाऱ्या तरुणाने पाच तरुणांना धडक दिली. ही संपूर्ण घटना अवघ्या ५ सेकंदात घडली असून, त्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Accident of a man caught between two buses and crushed terrfying video viral on social media
याला म्हणतात नशीब! दोन मोठ्या बसमध्ये अडकला अन् चिरडला; पण पुढच्याच क्षणी चमत्कार झाला, पाहा थरारक VIDEO
Shocking video taking a selfie with a running train puts a boy in danger shocking video
“बाळांनो आयुष्य म्हणजे खेळ नाही रे” सेल्फी घेण्यासाठी ट्रॅकच्या बाजूला उभा राहिला, पण मागून मृत्यू धावत आला; थरारक VIDEO
Heart touching video of police who help poor man on road video goes viral
“शेवटी हिशोब कर्माचा होतो” पोलिसानं गरीब रिक्षा चालकाबरोबर काय केलं पाहा; VIDEO बघून डोळ्यांत येईल पाणी
video of school students hugging each other in classroom went viral on social Media obscene video viral
भरवर्गात त्यानं तिला…, शाळेत विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही तर हद्दच…”

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका दुकानाबाहेर पाच तरुण खुर्च्यांवर बसून बोलत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी तेथे पांढऱ्या रंगाची कार आली आणि अक्षरश: पाचही जणांना चिरडले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> शेवटी रक्त वाघाचं आहे; वाघाच्या पिल्लानं केली भल्यामोठ्या हरणाची शिकार, VIDEO पाहून थक्क व्हाल

बरेच लोक पटकन ड्रायव्हिंग शिकण्यासाठी ते स्टीयरिंग व्हील फिरवतात परंतु पॉवर स्टीयरिंगमुळे ते असंतुलित होते, अशा परिस्थितीत, आपल्याला कारचे स्टेअरिंग स्थिर ठेवूनच वळण घ्यावे लागते. जेणेकरुन तुम्हाला ड्रायव्हिंग शिकण्यात कोणतीही अडचण येणार नाही. आणि तुम्ही कमी वेळात चांगले ड्रायव्हिंग शिकू शकाल.

अनेकदा कार चालवायला शिकणारे क्लच पूर्णपणे दाबत नाही आणि त्याशिवाय गीअर्स बदलू लागतात. त्यामुळे गीअर शिफ्टिंग करताना अडचण येते, जर तुम्ही क्लच दाबत असाल तर तो पूर्णपणे दाबा आणि त्यानंतरच गियर बदला.

Story img Loader