Viral Video : सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली रस्त्यावरून पळताना ट्रकखाली चिरडली. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. ही घटना उज्जैन येथील आहे.
अनेकदा लहान मुले कोणताही विचार न करता रस्ता ओलांडताना दिसतात. अशात पालकांनी लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. लहान मुलांना एकट्याने रस्ता ओलांडण्यास परवानगी देऊ नये, रस्ता ओलांडताना लहान मुलांची मदत करणे तसेच धावत्या रस्त्यावर मुलांना खेळू देऊ नये, इत्यादी प्रकारची काळजी घेत पालकांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
रस्त्यावरून पळताना चिमुकली भरधाव ट्रकखाली चिरडली
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका वाहत्या रस्त्यावर एक चिमुकली रस्ता ओलांडताना दिसते. सुरुवातीला ती रस्ता ओलांडून एका बाजूने दुसऱ्या बाजूला पळताना दिसते. त्यानंतर ती रस्ता ओलांडून परत धावत त्याच बाजूला येते. त्यानंतर जेव्हा ती परत रस्ता ओलांडण्यासाठी धावते, तेव्हा अचानक ट्रक येतो आणि ती ट्रकच्या चाकाखाली येते. ही घटना उज्जैन येथील आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
पाहा व्हायरल व्हिडीओ ( Viral Video)
kathashinde या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”आपल्या लहान मुलाला सांभाळून ठेवा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आई वडीलांची चुक आहे” तर एका युजरने लिहिलेय, “घरवाल्यांची चुक आहे ड्रायव्हरची चुक नाही.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मुलांवर लक्ष ठेवू शकता.” अनेक युजर्सनी पालकांना दोष दिला आहे. पालकांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे लिहिलेय.
यापूर्वी सोशल मीडियावर असे अनेक लहान मुलांच्या अपघाताचे व्हिडीओ समोर आले आहेत. अनेकदा पालकांच्या दुर्लक्षतेमुळे लहान मुलांच्या अपघाताची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.