Shocking video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळत असतात. हेच व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात. तसेच येथे आपल्याला असे काही व्हिडीओदेखील पाहायला मिळतात, जे आपल्याला आश्चर्यचकित करतात. काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील. मात्र यात नक्की चूक कुणाची आहे हे कळत नाहीये.
‘अतिघाई संकटात नेई’ असे म्हणतात. याचाच प्रत्यय आला आहे. काहीवेळा लोक घाई गडबडीत अशा चुका करतात की ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप होतो. जगात रोज कुठे ना कुठे अपघात होत असतात. वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. असाच एक अपघात समोर आला आहे.
सांगा चूक नक्की कुणाची?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक बाईक चालक समोरुन येतो आणि रस्त्यावरच पडतो. इथपर्यंत ठिक आहे पण तो बाईकवरुन पडल्यानंतर थेट समोरुन येणाऱ्या कारच्या चालाखाली जातो. चाकाखाली गेल्यानंतर तो ओरडतानाही दिसत आहे. मात्र तो कसा पडला? कसा चाकाखाली गेला हे कळतच नाहीये. सुदैवानं यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली नाही. गाडी मागे घेतल्यानंतर तो तिथून उठून जातो. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी त्याला मदत केल्याचं दिसत आहे. काळ कुणाला सांगून येत नसतो. तो कधीही आपल्या वाटेत येऊन आपला जीव घेऊ शकतो आणि आपल्यावर हे सुंदर जीवन जगण्याचा आनंद गमवावा लागू शकतो, त्यामुळे नियमांचे पालन करत प्रवास केला पाहिजे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “घाईत घेतलेला निर्णय नंतर पश्चाताप करायलाही वेळ देत नाही” ८ सेकंदचा VIDEO पाहून अंगावर काटा येईल; काय घडलं?
. सोशल मीडियावर हा व्हि़डीओ तुफान व्हायरल झाला असून @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.