Shocking video: काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांवर भन्नाट स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण, व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळविण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. धावत्या लोकलच्या दरवाजात स्टंट करताना एका तरुणाची काय अवस्था झाली ते पाहा. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

नको तिथे धाडस दाखवून अनेक जण अपघाताला आमंत्रण देतात; तर अनेक जण जीवानिशीही जातात. अशा बातम्या ऐकून वा प्रत्यक्ष तशा दुर्घटना बघूनही काही जण नको त्या गोष्टी करतात. मात्र, हे किती धोकादायक आणि जीवावर बेतू शकते हे या व्हिडीओतून पाहायला मिळाले आहे.

काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. असाच प्रकार या तरुणासोबत घडलाय.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण रेल्वे रुळाच्या बाजूला मोठ मोठ्यानं आक्रोश करताना, ओरडताना दिसत आहे. यावेळी तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याचा भयंकर अपघात झाला असून त्यात त्याचे दोन्ही पाय तुटले आहे. रक्ताच्या थारोळ्यात तो बसला असून मदतीसाठी याचना करत आहे. मात्र कुणीही त्याच्या मदतीला पुढे गेलेलं दिसत नाहीये.

पाहा व्हिडीओ

sukhvindersingh8160459060 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. वारंवार अशाप्रकारच्या अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, मात्र तरीही तरुणाई यातून धडा घेताना दिसत नाही. या व्हिडीओवर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.