सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, जे पाहिल्यानंतर आपणाला हसू आवरण कठीण होतं, तर काही व्हिडिओ असे असतात जे पाहिल्यानंतर आपणाला आपल्याच डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण व्हिडीओत एक माणूस बाईकचा हॅंडल न पकडता मागच्या सीटवर एका बाजूला पाय सोडून भरधाव वेगाने बाईकवरुन जाताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ १५ सेकंदांचा आहे, परंतु तो पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण बाईवर बसलेला माणूस मागच्या सीटवर एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून बसल्याचं दिसत आहे. एवढंच नव्हे तर ते चक्क धावत्या बाईकवर मोबाईलवर बोलत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. आपणाला हे दृश्य पाहताना धोकादायक वाटत असलं तरी बाईकवरचा माणूस मात्र आरामात फोनवर बोलत बसल्याचं दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी बाईकवर बसलेल्या व्यक्तीने बाईकचा हॅंडलदेखील पकडलेला नाही. स्वतःहून धावणारी बाईक बघून अनेकजण थक्क झाले आहेत.
हेही पाहा- लग्न समारंभात शंख आणायला विसरले भटजी, ऐनवेळी केला भन्नाट जुगाड, व्हायरल Video पाहून पोट धरुन हसाल
अनोख्या पद्धतीने बाईक चालवणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडओ @DoctorAjayita नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. शिवाय तो नेटकऱ्यांनादेखील खूप आवडल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ १ लाख ७३ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी तो लाईक केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये “खूप महत्त्वाचा कॉल” असं लिहिण्यात आलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्याच्या गर्लफ्रेंडचा कॉल असावा असं म्हटलं आहे. तर काहींनी खूप जबरदस्त ड्रायव्हर असल्याच्या कमेंट केल्या आहेत.