तुमच्या लग्नात जर तुमचा जुना प्रेमी पोहोचला तर तुम्हाला आनंद होईल की भीती वाटेल? प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं असं म्हटलं जातं. पण काही मंडळी या म्हणीला फारच गांभीर्यानं घेतात. अन् प्रेम मिळवण्याच्या नादात भलतंच काही तरी करून बसतात. असाच काहीसा धक्कादायक प्रकार राजस्थानमधून समोर आला आहे. लग्नाच्या मंडपात वधूच्या एक्स बॉयफ्रेंडने वरावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आरोपी स्टेजवर चढला अन् पुढे असं काही घडलं की एका क्षणात आनंदाच वातावरण दुख:त बदललं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
एका तरुणानं प्रेयसीचं लग्न दुसऱ्यासोबत होतंय हे पाहताच काय केलं पाहा. त्यानं भर लग्नात घुसून असं काही तरी केलं ज्यांची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. जर तुमचं हृदय कमकूवत असेल तर हा व्हिडीओ पाहू नका. कारण हा व्हिडीओ इतका थरारक आहे ज्यांची आपण कल्पना सुद्धा केली नसेल.
लग्नमंडपात एक्स बॉयफ्रेंडकडून नवरदेवावर चाकूने हल्ला
ही घटना राजस्थान राज्यातील चित्तोडगड जिल्ह्याजवळील भिलवाडा येथे घडली आहे. यावेळी भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आरोपी स्टेजवर चढला होता. वर वधूला त्याने भेटवस्तू देताच भीषण हल्ला केला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्नाच्या दिवशी स्टेजवर भेटवस्तू देण्याच्या बहाणे शंकरलाल गेला होता. त्यानंतर त्याने वरला बुक्कीने मारायला सुरुवात केली आणि त्यानंतर चाकूने देखील हल्ला केला. यावेळी नवरीनही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो ऐकयला तयार नव्हता. सुदैवाने पगडी आणि लग्नाचा पोशाख असल्यामुळे वराला गंभीर दुखापत झाली नाही. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या हल्लेखोरावर संताप व्यक्त केला आहे. वराच्या भावाने या घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेत आरोपीचा शोध सुरु केला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Photo: “पोरगी कसली पण असुदे फक्त…” पुणेकर तरुणानं लग्नाच्या बायोडेटात लिहली अशी अपेक्षा; बायडेटा पाहून पोट धरुन हसाल
मिळालेल्या माहितीनुसार, शंकरलाल असं आरोपीचे नाव आहे. वधूचे नाव भारती आहे. शंकरलाल आणि भारती दोन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते परंतु काही कारणांनंतर दोघांनीही प्रेम संबंध तोडले होते. त्यानंतर भारतीचे दुसऱ्या मुलाशी लग्न करायचे ठरवले. याचा शंकरलालला राग आला होता म्हणून त्याने हे कृत्य केले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.