Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल, हे सांगता येत नाही.कधी कोणी विचित्र गोष्टी करताना दिसतात तर कोणी सार्वजानिक ठिकाणी रिल्स बनवताना दिसतात. याशिवाय जुगाडचे सुद्धा अनेक क्रिएटिव्ह व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणाचा जुगाड पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. हा तरुण जुगाड करून फसवताना दिसत आहे.
व्हिडीओत काय दिसत आहे?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण एका मोठ्या यात्रेसमोर उभा राहून तेथील एक प्रवेश तिकीट खरेदी करतो. ही तिकीट ब्लॅक अँड व्हाइट आहे. या व्हिडीओत तरुण सांगतो की तो घरी येतो आणि या तिकीटांची प्रिंट काढतो त्यानंतर तो त्या तिकिटांबरोबर कस्टमायजेशन करताना दिसतो. त्यानंतर तो दावा करतो की कस्टमायजेशन केल्यानंतर ही सर्व तिकीटे हुबेहूब सारखे दिसत आहे. त्यानंतर या तिकिटांवर तरुण आणि त्याचे मित्र यात्रेत एंट्री करताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकं हा स्कॅम पाहून डोकं धरतील. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. दुसऱ्यांचा स्कॅम दाखवणारे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असाल पण स्वत: केलेला स्कॅम दाखणारा या तरुणाची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
व्हायरल व्हिडीओ
@terakyalenadena या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “इंडिया बिगनर्स साठी नाही” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “असा जुगाड भारतातच होतो” तर एका युजरने लिहिलेय, “भावा अभ्यासावर लक्ष दे, चोरीवर नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “तिकीट नंबर पाहिला नाही का?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत तर काही लोकांनी ‘असं भारतातच होतं’ असे लिहिलेय.