Shocking Car Accident Video : मुंबईतील कुर्ला बेस्ट बस अपघाताची भीषण घटना ताजी असतानाच देशभरातून अशा अनेक घटना समोर येत आहेत. कुर्ल्यातील बस अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आणि ४९ जण जखमी झाले. त्यांच्यावर सायन, भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मंगळवारी गुजरातमधून एका भीषण अपघाताची घटना समोर आली; ज्यात एक भरधाव एसयूव्ही कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यात घुसली. त्यावेळी तेथे बसलेले तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ढाब्यावर लोक जेवत असतानाच हा भीषण अपघात झाला. दरम्यान, सोशल मीडियावर या थरारक अपघाताच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झालेला व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहताना तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.

कार चालक हॉर्न वाजत, हेडलाईट मारत राहिला पण…

व्हिडीओमध्ये एक कार अचानक ढाब्याच्या दिशेने सुसाट वेगाने येताना दिसतेय. त्यावेळी सतत हॉर्न वाजवत आणि ढाब्याच्या बाजूने लावलेल्या हिरव्या कपड्यावर हेडलाईट मारत ती अनियंत्रित कार लोकांना बाजूला होण्याचा इशारा करीत होती; पण लोकांना काही कळण्याच्या आत ती कार ढाब्यात घुसली अन् जेवत बसलेल्या लोकांना सरळ उडवीत पुढे गेली. या घटनेचा व्हिडीओ पाहताना तुम्हालाही धडकी भरेल. कारण- हा अपघातच तितका भीषण होता.

Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबला? कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर!
top 10 search on google in 2024
Google Search: भारतीय गुगलवर गेल्या वर्षभरात काय शोधत होते माहितीये? गुगल सर्च रिपोर्टची माहिती आली समोर!
Family recreate iconic Hum Aapke Hain Koun scene
‘गाने बैठे गाना, सामने…’ कुटुंबातील सदस्यांनी ‘हम आपके है कौन’मधील ‘ते’ गाणं केलं रिक्रिएट; VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Bengaluru Diwali Firecrackers accident
VIDEO: “फटाक्यावर बसला तर नवीकोरी रिक्षा घेऊन देऊ”; तरुणाला पैज भारी पडली, मृत्यूचा थरार कॅमेरात कैद

हेही वाचा – फुटपाथवरुन चालत होती, तितक्यात जमिनीखालून झाला भीषण स्फोट अन्…; पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ रात्री १०.३० ते १ च्या दरम्यानचा असल्याचे सांगितले जाते. बोडेली येथील एका रस्त्याच्या कडेला असलेल्या अनधिकृत ढाब्यामध्ये काही ग्राहक बसले होते. ढाब्याच्या आत प्लास्टिक टेबल, खुर्च्या आणि बाजूने पडद्याची भिंत म्हणून हिरव्या रंगाचे कापड गुंडाळलेले होते.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ढाब्यामध्ये तीन ग्राहक बसून आरामात जेवण करीत होते आणि तिथला एक कर्मचारी ग्राहकांना काय हवे नको ते पाहत होता. सर्व व्यवस्थित सुरू असतानाच एक भरधाव अनियंत्रित एसयूव्ही कार हेडलाईट दाखवत थेट ढाब्यात घुसली अन् जेवणाऱ्या ग्राहकांना उडवीत पुढे गेली. त्यावेळी एक ग्राहक वेळीच सतर्क झाला आणि त्याने तिथून धाव घेत आपला जीव वाचवला; पण जेवणात मग्न असलेल्या इतर दोन ग्राहकांना कार सरळ उडवीत पुढे गेली. या अपघातात तीन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Story img Loader