Shocking Dance Video : आजकाल लोक सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काहीही करतात. लाइक्स, व्ह्यूजच्या नादात ते आपला जीव धोक्यात घालतानाही मागे पुढे पाहत नाहीत. सध्या अशाच एका जीवघेण्या डान्स प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यात दोन तरुण एका उंच टॉवरच्या रेलिंगवर उभे राहून चक्क नाचतायत. ते उभे असलेल्या उंचीवर कोणाची खाली वाकून बघण्याचीदेखील हिंमत होत नाही; त्या ठिकाणी उभं राहून ते तरुण चक्क नाचताना पाहून तु्मच्याही काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मज्जामस्तीत काम करण्याचा एक वेगळा आनंद असतो. यामुळे कामाचे दडपण जाणवत नाही आणि ते नीट पूर्णदेखील करता येते. यात जर कामात मदत करताना जोडीदार तुमच्यासारखाच असेल तर मग काही विचारू नका. व्हिडीओमध्ये अशाचप्रकारे एका टॉवरवर बांधकाम करणारे दोन कामगार मित्र आहेत, जे काम करताना टॉवरवरील एका रेलिंगवर उभे राहून आनंदाने नाचताना दिसतायत. यावेळी दोघांचाही उत्साह पाहण्यासारखा आहे.

दोघेही एका टॉवरवरील रेलिंगवर उभं राहून घेतायत नाचण्याचा आनंद

दोघेही टॉवरवरील एका उंच रेलिंगवर उभे आहेत. ज्या ठिकाणी उभं राहण्याची कोणाचीही सहसा हिंमत होणार नाही, त्या ठिकाणी उभं राहून दोघे कामगार चक्क नाचतानाचा व्हिडीओ शूट करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन कामगार मित्र एका टॉवरवरील उंच रेलिंगवर उभे राहून चक्क आनंदाने नाचत आहेत. मात्र, यावेळी त्यांनी आपल्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली आहे. पण, इतक्या उंचीवर त्यांना नाचताना पाहून लोकही घाबरले; पण त्या दोघांच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती दिसत नाही. चुकून दोघांपैकी एक पडला तर जीव जाऊ शकतो, गंभीर दुखापत होऊ शकते, पण त्यांना कसलीही फिकीर नाहीये.

हेही वाचा – ट्रेनमध्ये ‘ही’ सीट चुकूनही कोणालाही मिळू नये, तिकीट असूनही प्रवाशाला सहन करावा लागतोय त्रास; Video पाहून संतापले लोक

हा व्हिडीओ @maisuddin.786 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर आता अनेक लोक कमेंट्स करत प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने व्हिडीओवर लिहिले की, ‘भावा, एवढ्या उंचीवर नाचण्यासाठी हिंमत लागते’, तर दुसऱ्याने लिहिले की, ‘त्यांच्याकडे पाहून एवढेच म्हणता येईल की, दोघे भाऊ जबरदस्त आहेत.’ तिसऱ्या युजरने लिहिले की, “भावा, दोघांमध्ये कमालीचा आत्मविश्वास आहे.”