Shocking Death video: Shocking Death video: कधी कोणावर कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही. हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात लोकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जीव गेला. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. यामध्ये एक रिक्षाचालक छातीत दुखत असल्यामुळे स्वत: रिक्षा चालवत हॉस्पिटलमध्ये पोहोचला, मात्र डॉक्टर तपासत असतानाच त्यानं मान टाकली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पुढे काय झालं हे तुम्हीच पाहा.
ही घटना इंदूरमधील एका दवाखान्यातली आहे. येथील सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत हे स्पष्ट दिसत आहे की, डॉक्टरकडे आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तेथे उपस्थित लोकांना काही समजण्याआधीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. सोनू असं मृत तरुणाचं नाव आहे. रात्री आठच्या सुमारास तो भाग्यश्री रुग्णालयात पोहोचला. डॉक्टर त्याच्याशी बोलत होते. त्याला नेमकं काय झालंय याबद्दल विचारणा करत होते. डॉक्टर संवाद साधत असताना सोनूनं अचानक मान टाकली. तो डॉक्टरांच्या मांडीवर कोसळला. त्याला खुर्चीवर बसवण्याचा प्रयत्न झाला, पण त्याला स्वत:ला सावरता येत नव्हतं. खुर्चीवर टेकून बसवत असताना तो अचानक मागे गेला.
डॉक्टरांशिवाय एक नर्सही तिथे दिसत आहे. यावेळी रुग्णाला डॉक्टर तपासात होते आणि त्याला उपचार देत होते. पण, त्यानंतर हा रुग्ण बेशुद्ध पडला. यानंतर त्याला उठवेपर्यंत आणि काय होतंय हे कळेपर्यंत खूप उशीर झाला होता. पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात सोनूचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: काय बोलावं आता! पोलिसांचा चक्क डेप्युटी कलेक्टरवरच लाठीचार्ज; साहेब संतापले अन् पुढं काय झालं पाहाच
या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून @ purvanchal51 नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर शेअरही करत आहेत. एका युजरने पुढे लिहिले की, सकाळी घरातून बाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी जिवंत घरी परत येईल असा दावा कोणीही करू शकत नाही. हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे.