Wife Beating Husband video: सोशल मीडियावर घरगुती भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सासू, सून, नवरा-बायको यांच्यातील छोट्या-मोठ्या भांडणाच्या अनेक घटना सोशल मीडियावर दिसतात. नवरा आणि बायको म्हटलं तर वाद हे होणारच. मात्र घरगुती हिंसाचार म्हटलं की, पुरुषांनी महिलांवर केलेला हिंसाचारच डोळ्यासमोर येतो. पण, वस्तुस्थिती अशी आहे की,पुरुषही महिलांकडून घरगुती हिंसाचार सहन करत असतात. अशाच एका जोडप्याला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण एकच प्रश्न विचारत आहे ते म्हणजे, “मर्द को दर्द नाही होता?’ हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भर बाजारात एक महिला आपल्या नवऱ्याला अमानुष मारहाण करत आहे. त्याच्या कानाखाली मारतेय तर कधी त्याचे केस ओढतेय. तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र ती काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. ती एका मागोमाग त्याच्या कानाखाली मारत आहे. कधी त्याचे केस ओढत आहे तर कधी डोक्यात मारत आहे. महिलेने पतीचा हात पकडलेला दिसत आहे वारंवार ती पतीला निर्दयीपणे मारत आहे. आजूबाजूला काही लोक हे पाहत आहेत पण मध्यस्ती करण्यासाठी कुणीही पुढे येताना दिसत नाहीये. दरम्यान यावेळी तिथे उपस्थित असलेल्यापैकी कोणीतरही या घटनेचा व्हिडीओ काढला आहे. 

या भांडणाचं कारण म्हणजे या महिलेच्या नवऱ्याची नोकरी गेली आहे त्यामुळे ती संतापली असून माझ्याच जीवावर खातो म्हणत मारत आहे. मात्र तो ही माणूसच आहे हे ती विसरली आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर @gharkekalesh या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडीओला १४१.५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच या व्हिडीओवर नेटकरीही संताप व्यक्त करत महिलेवर जोरदार टीका करत आहे. एका युजरने प्रतिक्रिया देत “अन्याय फक्त स्त्रीयांवरच होत नाही” म्हंटलं आहे. तर आणखी एकानं या महिलेला अटक करण्याची विनंती केली आहे.