Vinod Kambli video viral: सध्या सोशल मीडियावर विनोद कांबळी यांचे नाव चर्चेत आले आहे. एकेकाळी विनोद कांबळी या नावाचा क्रिकेटविश्वात मोठा दबदबा होता. कारण- सर्वांत जलद कसोटी क्रिकेटमधील धावांचा विक्रम त्यांच्या नावावर होता. पण, दारूचं व्यसन त्यांना लागलं आणि कोण होतास तू, काय झालास तू… असं त्यांच्याबाबत घडलं. सचिन तेंडुलकर यांच्याबरोबर त्यांनी शालेय क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचला होता. भारतीय संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी यांची स्थिती अतिशय खराब झाली आहे. एकेकाळी स्टार असणाऱ्या कांबळींना आज चालताही येईना. विनोद कांबळींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही शॉक व्हाल.

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा जीवलग मित्र मानल्या जाणाऱ्या विनोद कांबळी यांचा एक व्हिडीओ सध्या सोधल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विनोद कांबळी यांना नीट चालताही येत नाहीये. एकेकाळी कोट्यवधी रुपयांची कमाई करणाऱ्या विनोद कांबळींना आज एक-एक रुपया महाग झाला आहे. इतकेच काय, तर त्यांची परिस्थिती इतकी दयनीय झालीय की, त्यांना चालताही येईना. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विनोद कांबळी यांना योग्य पद्धतीनं उभंदेखील राहता येत नाहीये. यावेळी उभं राहण्यासाठी त्यांना बाईकचा आधार घ्यावा लागतोय. यावेळी जेव्हा ते चालायचा प्रयत्न करतात, त्यावेळी आजूबाजूला असलेल्या लोकांनी त्यांना आधार दिला आणि उचलून त्यांना बाजूला नेलं. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाईट वाटेल.

Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Yuvraj Singh Backs Rohit Sharma Virat Kohli Amid Heavy Criticism on Poor Form
VIDEO: रोहित-विराटच्या मदतीला धावला युवराज सिंग; ट्रोलर्सचा समाचार घेताना म्हणाला…
Delhi CM Atishi
Video : बिधुरींच्या आक्षेपार्ह विधानानंतर वडिलांबद्दल बोलताना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अश्रू अनावर; म्हणाल्या, “ते इतके आजारी असतात की…”

विनोद कांबळींना नेमकं काय झालं?

विनोद कांबळींना नेमकं काय झालं? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. पण, सोशल मीडिया रिपोर्ट्सनुसार, मागील काही दिवसांपासून विनोद कांबळींची प्रकृती बिघडलीय. काही दिवसांपूर्वी पांढरे केस आणि हात जोडत असलेला विनोद यांचा फोटो व्हायरल झाला होता. आपल्याकडे कोणताच जॉब नाही आणि त्यामुळे घर चालवणं कठीण होऊन बसलं आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. एकेकाळी विनोद हे अनेकांच्या गळ्यातील ताईत होते. पण, आता त्यांच्यावर दारूच्या व्यसनामुळे ही वेळ आली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: पुणेकरांनो ट्रेकिंगला जाताय? पाण्याचा प्रवाह कसा वाढला पाहा; अडकलेल्या तरुणाची अवस्था पाहून घाम फुटेल

काही वर्षांपूर्वी विनोद कांबळी आर्थिक संकटात सापडले असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी पुढाकार घेत त्यांना मदत केली होती. सचिन यांनी त्यांची एका अकादमीत प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. याशिवाय ते मुंबई टी-२० लीगमध्ये टीमचे प्रशिक्षकही झाले. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि त्यामुळे त्यांना प्रशिक्षकपदाची नोकरी गमवावी लागली.

Story img Loader