मध्यप्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील एक लाजिरवाणा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये काही तरुण एका मुलीचा विनयभंग करत आहेत. हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी झालेल्या भगोरिया महोत्सवामधील आहे. आदिवासीबहुल अलीराजपूरच्या बालपूर गावात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एका मुलीवर काही मुलांनी धावून जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
आता या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, मुलगी तिथे उभ्या असलेल्या कारच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, तिथून जात असलेल्या एका टोळक्यातील तरुण धावत येतो आणि तिला अश्लीलपणे स्पर्श करू लागतो. यानंतर काही वेळातच आणखी एका तरुणाने तिला ग्रुपमध्ये ओढलं आणि ग्रुपमधील सर्व सदस्यांनी मुलीचा विनयभंग केला. माहितीनुसार, तरुणी आणि तरुण शेजारच्या धार जिल्ह्यातील एकाच गावातील रहिवासी होते.
(हे ही वाचा: Video: सुपरवुमन!! मॅडी ग्रीनचा ‘हा’ झेल एकदा बघाच, समालोचकासह प्रेक्षकही झाले आश्चर्यचकित)
(हे ही वाचा: Viral Video: रशियन मॅकडोनाल्डच्या बाहेर लागली न संपणारी रांग कारण…)
आरोपींना लवकरच अटक करणार
या घटनेनंतर अलीराजपूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी दखल घेतली आणि गुन्हा दाखल केला. ते म्हणाले की, आम्ही काही तरुणांची ओळख पटवली आहे. त्यांना पकडण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे ते म्हणाले.
(हे ही वाचा: Video: भारत-चीन सीमेवर उणे तापमानात बर्फावर ITBP जवानांची रंगवला कबड्डीचा सामना)
यापूर्वीही झाली होती अशी घटना
सप्टेंबर २०२१ मध्येही याच जिल्ह्यात एका महिलेवर बलात्कार झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही लोक महिलेला मारहाण करत होते. या घटनेत महिलेच्या पतीचाही सहभाग होता. सोंडवा पोलीस ठाण्याच्या उमराली गावातील या व्हिडीओनंतर पोलीस मदतीला आले आणि काही लोकांना अटक करण्यात आली.