Pakistan old swift second hand car price भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानात महागाईमुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक अडचणीत सापडला आहे. वाढत्या महागाईमुळे पाकिस्तानातील सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. येथील लोकांना कुटुंब चालवणं म्हणजे तारेवरची कसरत वाटू लागलं आहे. पाकिस्तानमध्ये महागाईचा कहर सुरूच असून, अलीकडे पाकिस्तानमध्ये सेकंड हँड कारच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. विशेषत: सुझुकी स्विफ्ट सारख्या प्रसिद्ध कारच्या सेकंड हँड युनिटच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सेकंड हँड गाड्या म्हणजे तुमच्या मनात सहाजीकच अर्धी किंमक स्वस्त गाडी असा विचार आला असेल मात्र पाकिस्तानमधल्या सेकंड हँड गाड्यांच्या किंमत ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. यासंदर्भातील एक व्हिडीओही सध्या समोर आला असून व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

पाकिस्तानात सेकंड हँड स्विफ्ट कारच्या किमती जवळपास २० लाखांपर्यंत पोहोचल्या आहेत.त्यामुळे खरेदीदार आश्चर्यचकित आणि नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये पाकिस्तानातील कार मार्केट दाखवण्यात आले आहे, ज्यामध्ये सेकंड हँड स्विफ्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

२०१४ मध्ये भारतात बंद करण्यात आलेली स्विफ्ट सध्या पाकिस्तानमध्ये २० लाख रुपयांना उपलब्ध आहे. होय, महागाईने होरपळत असलेल्या पाकिस्तानमधील लोकांसाठी सेकंड हँड कार खरेदी करणे आता स्वप्नासारखे झाले आहे. जिथे ८ ते ९ वर्षे जुनी स्विफ्ट सारखी मध्यमवर्गीय कार २० लाख रुपयांना विकली जात आहे. जर आपण भारतात या कारची किंमत पाहिली तर सुमारे ७ लाख रुपये आहे जी खूप जास्त आहे. कारण स्विफ्टच्या नवीन मॉडेलची एक्स-शोरूम किंमत भारतात सुमारे ६.५ लाख रुपयांपासून सुरू होते. पाकिस्तानमधील कारच्या किमती वाढण्यामागील प्रमुख कारण म्हणजे परकीय चलनाच्या कमतरतेमुळे नवीन कारची आयात महाग झाली आहे, त्यामुळे सेकंड हँड कारची मागणी आणि किमती दोन्ही वाढल्या आहेत.या दरवाढीचा सर्वात मोठा परिणाम मध्यमवर्गीय कुटुंबांवर झाला आहे, ज्यांना कमी बजेटमध्ये चांगली सेकंड हँड कार घ्यायची होती. जिथे पूर्वी २० लाख रुपयांना नवीन कार खरेदी करता येत होती, आता तीच रक्कम सेकंड हँड कारसाठी खर्च करावी लागणार आहे.

पाहा व्हिडीओ

u

हेही वाचा >> मृत्यूच्या तावडीतून तरुणाने आत्महत्या करणाऱ्याला वाचवलं; VIDEO पाहून काळजाचा ठोका चुकेल एवढं नक्की

सोशल मीडियावर हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. त्याच वेळी भारतीय नेटकरी किमतींबाबत पाकिस्तानची खिल्ली उडवताना दिसत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले… या किमतीत आम्हाला ३ स्विफ्ट्स मिळतील आणि तेही अगदी नवीन. दुसऱ्या युजरने लिहिले…ही कार आमच्याकडे १ ते १.२५ लाख रुपयांना मिळेल. तर तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… आज पहिल्यांदाच मला पाकिस्तानी लोकांसाठी वाईट वाटत आहे.