Shark Attacks Old Woman: समुद्रात शेकडो जीव-जंतू राहतात. अनेक छोट्या माशांपासून ते धोकादायक मोठ्या माशांपर्यंत शेकडो जलचरांचं समुद्रात वास्तव्य असतं. खरंतर माणूसच त्यांच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा मोठ्या धोकादायक माशांकडून माणसांवर पाण्यात हल्ला झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. इतिहासामध्ये आजपर्यंत अनेक शार्क हल्ले झालं असून यामधी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असाच माशाच्या हल्ल्याचा एक भयानक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाहून तुमचाही थरकाप उडेल.

शार्क हा समुद्रातील खतरनाक माश्यांपैकी एक आहे. हा मासा पाण्यामध्ये रक्त असल्यास त्याकडे लगेच आकर्षित होतो. जमिनीवरील प्राण्यांप्रमाणे समुद्रामध्येही प्रत्येक जलचर जीव ठराविक भागांमध्ये आढळतो. वास्तव्याच्या ठिकाणी हस्तक्षेप केल्याने ते जीव समोरच्या जीवावर बचावाच्या दृष्टीने हल्ला करतात.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…

थायलंडमध्ये एका पर्यटक महिलेवर शार्क जिवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत तिच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली शार्क माशाने महिलेचा पाय पकडला आणि जखमी केले.रक्तस्त्राव झाल्यानंतर ती वेदनेनं ओरडी लागली तेव्हा इतर पर्यटकांनी आणि जीवरक्षकाने तिची सुटका केली. शार्क माशाचा हल्ला इतका भयानक होता की महिलेच्या पायावर कोरलेल्या शार्कच्या दातांच्या खुणा १२ इंच एवढ्या आहेत. खाओ लाक बीचजवळील स्थानिक रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. प्राथमिक वैद्यकीय उपचार आणि काळजी घेतल्यानंतर, तिला फुकेतमध्ये आणीबाणीच्या शस्त्रक्रियेसाठी स्थानांतरित करण्यात आले. बरे होण्यासाठी तिच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया होणार असल्याचेही सांगितले जात आहे.

मदतीसाठी महिलेचा आरडाओरडा ऐकून जीवरक्षकाने प्राण वाचवले

“एका परदेशी पर्यटकाने हात वर करून मदतीसाठी आरडाओरडा केला. पर्यटकाला मदत करण्यासाठी मी त्वरीत समुद्रकिनाऱ्यावर धावलो, पर्यटक ज्या भागात पाण्यात खेळायला गेला होता तो भाग फार खोल नव्हता,तो सुरक्षित वाटत होता” मात्र तरीही हे घडलं” लाइफगार्ड अथित अथित पिन्यो यांनी द सनला सांगितले.

पाहा फोटो

हेही वाचा >> नशीब म्हणजे काय? ते ‘हा’ VIDEO बघून कळेल; अवघ्या ५ सेंकदात मृत्यूच्या दारातून तरुण कसा परत आला पाहा

सरकार सुरक्षा उपायांना चालना देणार

“अधिकाऱ्यांनी इशारे जारी केले आहेत, समुद्रकिनाऱ्यांवर लाल झेंडे लावले आहेत आणि पर्यटकांचे संरक्षण करण्यासाठी जीवरक्षक सेवांसह सुरक्षा उपायांना चालना देत आहेत”, थाई सरकारने या घटनेचा ऑनलाइन अहवाल देताना सांगितले.

Story img Loader