Shocking video: डोंगर, दऱ्या आणि नद्यांचे सौंदर्य पाहायला कोणाला आवडतं नाही. धबधब्यांवरून कोसळते पाणी आणि आकाशातील ढगांना स्पर्श करणाऱ्या डोंगरांमध्ये सुट्ट्या घालवण्याची एक वेगळीच मज्जा असते पण फोटो, रिल्स बनवण्याच्या नादात तरुणाई हरवून गेली आहे. जीवाची पर्वा न करता रिल्स बनवताना दिसत आहे. सोशल मीडियावर लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात. बऱ्याचदा लोक यासाठी आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाही. हीच हिरोगीरी कधीकधी जिवावरही बेतत. असाच एक समुद्रातील व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही समुद्रात असं धाडस करताना दहा वेळा विचार कराल.

तरुण-तरुणी भिजण्यासाठी आणि मजामस्ती करत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी धबधबे, धरण, नदीवर पोहोचता. काहीजण समुद्र किनारी जातात. अनेक लोकांसाठी हा एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे. लोक आपल्या प्रियजनांसह याठिकाणी वेळ घालवतात.तुम्हाला माहिती आहे की अनेक वेळा समुद्रकिनाऱ्यावर मोठ मोठ्या लाटा उसळतात. कधी भरती तर कधी अहोटी.अशावेळी मजा-मस्ती करताना स्वत:चीही तितकीच काळजी घेणं आवश्यक आहे. मात्र हल्लीची तरुण पिढी वेगवेगळे स्टंट करत आपला जीव धोक्यात घालतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तीन तरुण समुद्राच्या मध्ये असणाऱ्या खडकावर लाटांसोबत खेळत आहे. या विशाल लाटा समुद्र जणू बाहेरच फेकत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही समुद्राचं रौद्ररुप पाहू शकता, मात्र हे तरुण याच समुद्राच्या लाटांमध्ये हुल्लडबाजी करताना दिसत आहे. इतक्या उंच लाटा आहेत की सहज कुणीही वाहून जाईल मात्र हे तरुण लाट आली की खडकाच्या खाली लपून बसायचे आणि लाट गेली की पुन्हा उभे राहायचे. मात्र त्यांची ही लपाछुपी जास्त काळ चालली नाही, पुढच्याच क्षणी समुद्रात तुफान लाट आणि या तरुणांना घेऊन गेली.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ _kunz0505 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं म्हंटलंय, “आयुष्याशी खेळाल तर देव तुमच्याशी खेळेल” तर आणखी एकानं, “अशा प्रकारे पाण्याशी खेळणं, रिस्क घेणं किती महागात पडू शकते हे हा व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे.”